गडचिरोली – भोपालपटणम राष्ट्रीय महामार्गासाठी शिवशंकर अरगेलवार यांची मागणी.!

गडचिरोली- भोपालपटणम राष्ट्रीय महामार्ग नंदीगाव फाटा वगळून सिरोंचा बस स्थानकाला जोडा !
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

सिरोंचा दि २ जुलै : गडचिरोली जिल्हा मुख्यालयापासून छत्तीसगड राज्याला जोडणारा राष्ट्रीय महामार्ग सिरोचा तालुक्यातील ‘नंदीगांव’ फाट्यापासून न वळवता सिरोंचा बस स्थानकापर्यत जोडण्याची मागणी केंद्रिय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली. सिरोंचा येथील भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते शिवशंकर अरगलवार यांनी पंजीबद्ध डाकेने उपरनिर्दष्ट निवेदन पाठविले आहे.

निवेदनात अरगेलवार म्हणतात की, राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या कार्यकाळात  “पंतप्रधान सुवर्ण चतुष्कोन योजना” अंतर्गत राष्ट्रीय महामार्गांच्या बांधकामास सुरुवात झाली. याचाच एक भाग म्हणून अलिकडे महाराष्ट्रच्या गडचिरोली जिल्हा मुख्यालया पासून सिरोंचा मार्गे थेट छत्तीसगड राज्याला जोडणारा मार्ग प्रस्तावित आहे,प्रस्तुत मार्ग गडचिरोली ते सिरोंचा तालुका मार्गे भोपाल पटणम (छत्तीसगड) ला जोडतो. मात्र बांधकाम सिरोंचा तालुका मुख्यालयाच्या बसस्थानकापर्यंत न नेता सिरोचापासून ३ कि.मी. अंतरावरील ‘नंदीगांव’ फाट्यापासून वळणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे महाराष्ट्रसह छत्तीसगड, मध्यप्रदेश, तेलंगणा व आंध्र प्रदेशच्या नागरिकांमध्ये रोष व्याप्त आहे.

सध्यस्थितीत सीमावर्तीय पाचही राज्यातून सिरोचा तालुका मुख्यालयापर्यंत संबंधित राज्य परिवहन महामंडळाच्या तसेच इतर बस सेवा अव्याहत पणे सुरु आहेत. तथापी रस्त्याचे बांधकाम सिरोंचा बसस्थानकापर्यंत न होता, निर्मनुष्य क्षेत्रापासून, अर्थात ‘नंदीगाव फाट्यापासून होणार असल्याने त्या-त्या राज्यातील प्रवाशांची अडचण होणार आहे. वास्तविक गडचिरोली जिल्हा मुख्यालय व सिरोंचा तालुका मुख्यालय येथून सुटणारी वाहने असरल्ली (सिरोंचा तालुका) मार्गे छत्तीसगडला पोहोचतात. सिरोंचा ते असरल्ली या ३१ किमी. मार्गाची रुंदी २१ .५०० मीटर असून सिरोंचा बस स्थानकापर्यतच्या बांधकामास अनुकूल आहे. येथे ५ वर्षापूर्वी २ कोटी रु. खर्चाचे बस स्थानकाचे बांधकाम अर्धे अधिक पूर्ण झाल्यावर मागील २ वर्षापासून पूर्णतः ठप्प पडले आहे.

प्रस्तुत कामास गती देऊन संबंधित बांधकाम सिरोंचा बस स्थानकापर्यंत होण्यास कृतिशील सहकार्य करावे. जेणेकरून सीमावर्तीय पाचही राज्यातील नागरिकाच्या जिव्हाळ्याचा प्रश्न तडीस जाईल, अशी विनंतीपूर्ण मागणी अरगेलवार यांनी केंद्रीय परिवहन मंत्री गडकरी यांना केली आहे.

हे देखील वाचा,

“लोकस्पर्श न्यूज” च्या नव्या कार्यालयाचे थाटात उद्घाटन.

अमरावती हत्याकांडाचे उदयपूर कनेक्शन..?

कल्परुक्ष – मोह झाडाचा प्रत्येक भाग गुणकारी; मुख्य वनसंरक्षक डॉ किशोर मानकर

 

 

 

collector sanjay meenalead news nitin gadkariMinister Eknath Shinde