गडचिरोली तुंबलेली गटारे व नाल्यांची सफाई केंव्हा ?

गडचिरोली दि,३ जुलै :-  गड़चिरोली शहराच्या सर्व प्रभागातील गटारे व नाल्या तुंबलेल्या असून त्यांची दुरवस्था झाली आहे. नगर परिषद यंत्रणेने वेळीच दखल घेऊन सफाई कामास सुरुवात करावी अशी नागरिकांची मागणी आहे. पावसाला सुरु होऊन महिना लोटला. दरम्यान केवळ दोनदा पावसाने हजेरी लावली. समाधानकारक पाऊस अद्याप बरसलाच नाही. तथापि या दोन वेळच्या पावसाने वार्डा- वार्डातील सांडपाण्याची गटारे व नाल्या तुंबलेल्या आहेत.

काही वार्डाच्या सखल भागातील नाल्या तुडूंब भरल्याने घाण पाणी व चिखलाचे साम्राज्य पसरले. काँक्रिट रस्त्यांच्या दुतर्फा सौदर्यकरणाच्या हेतूने आच्छादन केलेल्या दोन रंगी गट्टू पेवरचे काही अंशी विद्रुपीकरण झाले. दमदार पावसाचे दर्शन दुर्लभ असल्याच्या पार्श्वभूमिवर दोनदा झालेल्या मध्यम पावसाने वातावरणात गारवा निर्माण होऊन अंगाची काहिली करणाच्या उन्हाची तीव्रता कमी झाली.

मात्र तुंबलेल्या नाल्यांत डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने नागरिक बेजार झाले आहेत. आगामी दिवसात काळात हिवताप, मलेरिया व तत्सम साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नगर परिषदेने नाल्यांची योग्य सफाई करून डास निर्मूलनाच्या दृष्टीने धुरीकरणाची प्रक्रिया पूर्ण करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.

हे देखील वाचा, https://loksparsh.com/top-news/maharashtra-vidhan-sabha-speaker-rahul-narvekar-maharashtra-assembly/27157/

gadchiroli collectorGadchiroli nagar palikaMLA devrao holiMP Ashok Nete