शासकीय निमशासकीय व जिल्हा परिषद वाहन चालक संघटनेची सभा पडली पार..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गडचिरोली, दि. ६ मार्च :  महाराष्ट्र राज्य शासकीय निमशासकीय व जिल्हा परिषद वाहन चालक वर्ग 3 कर्मचारी संघटनेच्या चंद्रपूर गडचिरोली जिल्हा शाखेची सभा रविवारी 6 मार्च 2022 रोजी गडचिरोली येथील वनविभागाच्या वन विश्रामगृहातील टिपागड सभागृहात पार पडली.

शासकीय, निमशासकीय व जिल्हा परिषदेच्या वाहन चालकांच्या अनेक समस्या आहेत. अनेक मागण्या शासन दरबारी धूळखात आहे. त्यामुळे या समस्या निकाली काढण्याच्या उद्देशानं महाराष्ट्र राज्य शासकीय, निमशासकीय व जिल्हा परिषद वाहन चालक वर्ग ३ कर्मचारी ही संघटना पोटतिडकीनं कामाला लागली आहे. याचं पार्श्वभूमीवर ६ मार्चला गडचिरोलीत संघटनेच्या चंद्रपूर गडचिरोली जिल्हा शाखेचे अध्यक्ष दीपक हिवरे यांच्या अध्यक्षतेखाली सभा आयोजित केली गेली.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शाखेचे उपाध्यक्ष अशोक नामेवार, सचिव नरेंद्र शिडाम, कार्याध्यक्ष सोनू अतकरे, राकेश खापर्डे, प्रविण गोंगले, मयुर ढुमणे यांचेसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

सभेच्या प्रारंभी संघटनेच्या चंद्रपूर गडचिरोली जिल्हा शाखेच्या कार्यकारिणीच्या सहसचिव पदावर गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयाचे वाहन चालक श्याम दहिकर, संघटक पदावर गडचिरोली वनविभागाचे वाहन चालक सुधीर गेडाम, कार्याध्यक्ष पदावर जिल्हा परिषदेचे वाहन चालक एन पी खेवले आणि प्रसिद्ध प्रमुख पदावर एफ डी सी एम च्या ब्रम्हपुरी वन प्रकल्प विभागाचे प्रविण गोंगले यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

यावेळी उपस्थित मान्यवर, पदाधिकारी व वाहन चालकांनी नवनियुक्तांचे अभिनंदन केले तर, नवनियुक्तांनी शाखा वाढवून वाहन चालकांच्या समस्या सोडविण्याचा शब्द दिला. यानंतर उपस्थित वाहन चालकांच्या प्रमुख मागण्या व समस्या जाणून घेण्यात आल्या. यासोबतच मुंबई हायकोर्ट व मॅट मधील वाहन चालकांच्या केस बद्दल चर्चा करून नविन कार्यकारिणी सभासद बनविणे, सेवानिवृत्त वाहन चालकांचा निरोप समारंभ आयोजित करणे, वार्षिक वर्गणी गोळा करणे, यासह अन्य महत्वपुर्ण विषयांवर यावर चर्चा करण्यात आली.

उपस्थित वाहन चालकांच्या समस्यांचं निराकरण करून एकजुटीचा संदेश दिला गेला.

त्यानंतर शाखेचे अध्यक्ष हिवरे यांचेसह अन्य प्रमुख पदाधिकारी व मान्यवरांनी मागण्या जाणून घेत मागण्या निकाली काढण्यासाठी संघटना पुर्ण ताकदीनिशी कामाला लागण्याचे आश्वासन दिले. यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील सर्व शासकीय विभागाच्या वाहन चालकांनी एकजुट व्हावे, असं आव्हानही यावेळी मान्यवरांनी केले.

या सभेला वाहन चालक आशिष पोरेड्डीवार, धीरज चौधरी, दिपक दुधबवरे, मुनाज शेख, चंदू वडलकोंडावर, सागर राख, संजय कुळसंगे यांच्यासह गडचिरोली जिल्ह्यातील सर्व शासकीय निमशासकीय व जिल्हा परिषदेतील वाहन चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हे देखील वाचा : 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला मिळाले उपयोगी वाहन

चक्क, त्या तीन बहिणींनी नवराच केला एकमेकांत शेयर..

 

 

chalak sanghatna gadchirolilead news