कुंभमेळ्यात तिसऱ्या शाही स्नानासाठी साधूंची एकच गर्दी

कोरोनाचे नियम पायदळी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

हरिद्वार डेस्क 23 एप्रिल:- हरिद्वारमध्ये सुरु असणाऱ्या महाकुंभ मेळ्याच्या दुसऱ्या शाही स्नानाच्या दिवशी उसळलेली गर्दी पाहून कोरोनाला अशा ठिकाणांवर फैलावण्यापासून रोखायचं तरी कसं, हाच प्रश्न सर्वांना पडला.

किंबहुना दुसऱ्या शाही स्नानानंतर लगेचच इथं अनेक जणांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक बाबही समोर आली.

कुंभ मेळा कोरोनाचा सुपर स्प्रेडर ठरु शकतो असं अनेक अभ्यासकांनी म्हटलंही. पण, तिसऱ्या शाही स्नानाच्या दिवशीही असंच चित्र पाहायला मिळालं.

कुंभ मेळ्यातील तिसऱ्या शाही स्नानामध्ये निरंजनी आखाड्यातील साधू सहभागी झाले.

हर की पौडी येथे घाटावर त्यांनी गंगास्नानात सहभाग घेतला. यावेळी मोठ्या संख्येनं झालेली गर्दी पाहता पुन्हा एकदा कोरोना प्रतिबंधात्मक सोशल डिस्टन्सिंगचे नियम पायदळी तुडवले गेल्याचं स्पष्ट झालं

no rule followshahi shanasocial distancing