सोशल मीडियावर नग्न फोटो पोस्ट करणे पडले महागात…

अभिनेता रणवीर सिंग विरोधात गुन्हा दाखल ...
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई प्रतिनिधी 26 जुलै :-  अभिनेता रणवीर सिंगच्या विरोधात चेंबूर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल झाला आहे. रणवीर सिंग याने सोशल मीडियावर केलेल्या आक्षेपहार्य पोस्टमुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भादंवि कलम 292 ,293 , 509 आणि आयटी ॲक्ट 67 ( ए )अंतर्गत चेंबूर पोलीस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रणवीरने एका मासिकासाठी नग्न फोटोशूट केल्यानंओस्ततर “महिलांच्या भावना दुखावल्याबद्दल” मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आता रणवीर सिंगच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

एका मासिकासाठी नग्न फोटोशूट केल्यानंतर बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. रणवीरच्या न्यूड फोटोशूटवर समाजातील विविध स्तरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. काही लोक रणवीर सिंह च्या विरोधात बोलत त्याच्यावर टिकेची झोड उडाली आहे. तर , काही लोक रणवीरच्या समर्थन देखील करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याने केलेल्या नुड फोटोशुट मधील फोटो त्याने सोशल मीडियावर टाकल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा गुन्हा IT कायदा, 2000 च्या 67A अंतर्गत दाखल करण्यात आला आहे.कलम 67A हा अजामीनपात्र गुन्हा असल्याने त्याला अटकपूर्व जामिन घ्यावा लागेल असे मत सायबर कायदा तज्ञ अ‍ॅड (डॉ.) प्रशांत माळी यांनी व्यक्त केले आहे.

हे देखील वाचा :- 

FIRNude photoshootRanveer Singh