वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत पावलेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांना आता मिळणार २० लाख रुपये !

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची विधानसभेत घोषणा
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई 25 ऑगस्ट :-  वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांना यापूर्वी शासनाकडून १५ लाख रुपयांची आर्थिक मदत मिळत होती, आता ती रक्कम २० लाख रुपये करण्यात आल्याची घोषणा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत केली. त्याचबरोबर एखादी व्यक्ती कायम अपंग झाल्यास ५ लाख रुपये तर गंभीररित्या जखमी झाल्यास १ लाख २५ हजार इतके अर्थसहाय्य मिळणार आहे.तर किरकोळ जखमी झालेल्या व्यक्तीस औषधोपचारासाठी २० हजार रक्कम मिळणार आहे.

वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मागील ३ वर्षात २१३ जणांचा बळी गेला आहे. राज्याच्या वनविभागाच्या माध्यमातून उत्तम वनसंवर्धनाचे काम सुरू आहे.त्यामुळे मागील काही वर्षांत वन्य प्राण्यांच्या संख्येत चांगल्या प्रकारे वाढ झाली आहे. मानव वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी जंगलाच्या आजूबाजूच्या गावात राहणाऱ्या नागरिकांचे प्रबोधन करण्यात येत आहे. डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजना प्रभावीपणे राबविण्याचे प्रयत्न वनविभागातर्फे सुरू आहेत.

हे देखील वाचा :-

माणुसकीला काळिमा फासणारी घटना… टेम्पोत सापडले स्त्री जातीचे बेवारस अर्भक…

 

chnadarpurGadchirolisudhir munghantiwartiger attcktigher