सोने आणि चांदीच्या दरात पुन्हा घसरण

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क, दि. ६ मार्च: आठवडा संपता संपता सोने आणि चांदीच्या दरात पुन्हा घसरण पहायला मिळत आहे. गुरुवार आणि शुक्रवार असे सलग दोन दिवस दर आणखी कमी झाले. सोनं बाराशे रुपयांनी कमी होत प्रतितोळा 45 हजार 300 रुपयावर आलेलं आहे. तर चांदी तब्बल तीन हजार रुपयांनी घसरली आहे. सध्या ती प्रतिकिलो 66 हजार 500 रुपये इतकी आहे. सोन्याच्या दरात झालेली घसरण ही गेल्या दहा महिन्यातला सर्वात निच्चांकी मानली जात आहे.

आता लग्नाचा सिझन सुरु झालेला आहे आणि त्यामुळे सोन्याला मागणीही बऱ्यापैकी आहे. सोन्यातल्या गुंतवणुकीसाठीही हा काळ चांगला असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे. गेल्या ऑगस्टमध्ये सोनं प्रतितोळा 56 हजार 254 वर पोहोचलेलं होतं. तो उच्चांकी भाव होता. त्यानंतर आता तो 45 हजाराकडे आलेला आहे. याचाच अर्थ सोनं जवळपास 12 हजारांनी स्वस्त झालेलं आहे. पुढच्या काही काळात सोनं आणखी स्वस्त होऊन ते 42 हजारापर्यंत येऊ शकतं असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. फेब्रुवारी महिन्यात सोन्याच्या दरात सर्वात मोठी घसरण पहायला मिळाली आहे. चांदीही याच सर्व काळात जवळपास 10 हजारानं स्वस्त झाली आहे.