चंद्रपुरात वाघोबाचे दर्शन, व्हिडीओ व्हायरल

चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राच्या नागपूर मार्गावरील प्रवेशद्वारावर वाघाचा मुक्त संचार बघायला मिळाला आहे.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

चंद्रपूर, दि. १५ फेब्रुवारी : चंद्रपुरात पहाटेच्या सुमारास वाघोबाचे दर्शन झाले आहे. चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राच्या नागपूर मार्गावरील प्रवेशद्वारावर वाघाचा मुक्त संचार बघायला मिळाला आहे. या भागात कार्यरत कामगारांना वाघाचे दर्शन झाले. या प्रवेशद्वारातून थेट वसाहत आणि कोळसा हाताळणी यंत्राकडे मार्ग जातो. वीज केंद्राच्या परिसरात वाघासह अन्य वन्यजीव कामगारांसाठी धोकादायक ठरत आहेत. या समस्येवर वनविभाग आणि वीज केंद्र व्यवस्थापन यांनी संयुक्तरित्या उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

या परिसरात वाघाचे दर्शन सातत्याने होत आहे. अशावेळी एकादा अपघात घडू शकतो, अशी शक्यता आहे. कामगार आणि स्थानिकांनी वनविभागाला विनंती केली आहे, की या वाघाचा तत्काळ बंदोबस्त करावा. अन्यथा एखाद्याचा जीवही जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हे देखील वाचा : 

काँग्रेसचा नगर पंचायतींमध्ये सर्वाधिक बोलबाला

मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु निवासस्थानाच्या वीज बिल वापरात डॉ सुहास पेडणेकर यांची आघाडी

पट्टेदार वाघ मृतावस्थेत आढ़ल्याने वनविभागात उडाली खळबळ..

 

 

lead news