चक्क श्वानाला केली मानद पदविका प्रदान

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

न्यू जर्सी, 3 जून- माणसाला सोबत करणारा आणि प्रसंगी जीवही पणाला लावणारा पाळीव प्राणी म्हणजे कुत्रा. अमेरिकेसारख्या पुढारलेल्या देशात कुत्र्यांच्या या चांगल्या गुणांचा उपयोग करून यांना विशेष प्रशिक्षण दिले जाते. असे प्रशिक्षित कुत्रे अपंग व्यक्तींना ते चांगल्या प्रकारे सेवा देऊ शकतात. यांना सर्विस डॉग असे म्हटले जाते. अशाच एका सर्विस डॉगचे अमेरिकेतील एका विद्याठाकडून मानद पदविका देऊन कौतुक करण्यात आले आहे. न्यू जर्सी येथील सेटन हॉल विद्यापीठात पदवीदान समारंभाचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे युनिव्हर्सिटीच्या इंस्टाग्राम पेजद्वारे शेअर केलेला, व्हिडिओमध्ये एक विशेष दिव्यांग विद्यार्थिनी तिच्या व्हीलचेअरवर व्यासपीठाजवळ येताना दिसत आहे. तिच्यासोबत, एक शानदार सर्व्हिस डॉग विद्यार्थ्याला मार्गदर्शन करताना दिसतो.

न्यू जर्सीमध्ये जस्टीन नावाचा 6 वर्षीय लॅब्राडोर श्वानाने आपली मालकीण दिव्यांग विद्यार्थीवी ग्रेस मारियानी हीला विद्यापीठात शिक्षण घेण्यासाठी खूप मदत केली आहे. मारियानी व्हिलचेअरला खिळून असते, तिच्या मदतीसाठी जस्टिन सदैव तिच्यासोबत सावलीप्रमाणे वावरतो. मारियानीला विद्यापीठाकडून बॅचलर ऑफ सायन्स इन एज्युकेशनच्या पदवीने गौरविण्यात आले. तिच्यासोबत या जस्टीन या कुत्र्याला त्याच्या कामाचे कौतुक म्हणून मानद पदविका प्रदान करण्यात आली आहे. जस्टिनने देखील मारियानी प्रमाणेच शिक्षण पूर्ण केल्याचे विद्यापीठाचे मानणे आहे. विद्यापीठाने जस्टिन या श्वानाला डिप्लोमा प्रदान करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 15 लाखाहून अधिक ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडिओत विद्यापीठ प्रमुख जोसेफ ई न्यारे हे मारियानीला पदवी तर जस्टिनला पदविका प्रदान करताना दिसून येतात. जस्टिन स्वत:चा डिप्लोमा तोंडाने पकडत असताना आणि उपस्थित लोक टाळ्या वाजवत असल्याचे यात दिसून येते.

हे पण वाचा :-