ट्विटरच्या ब्लू टिकसाठी आता महिन्याला 900 रुपये मोजावे लागणार

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

मुंबई 19 जानेवारी :- लॉन मस्क यांच्या मालकीच्या ट्विटरने अॅंड्रॉईड  साठी ट्विटर ब्लू टिक  सबस्क्रिप्शनची किंमत जाहीर केली आहे. अॅंड्रॉईड  वापरकर्त्यांसाठी आता ब्लू टिकसाठी महिन्याला 11 डॉलर्स म्हणजे जवळपास 900 रुपये मोजावे लागणार आहेत. ही किंमत iOS सदस्यांसाठी समान आहे. मासिक शुल्काच्या तुलनेत ट्विटरकडून वेब वापरकर्त्यांसाठी मात्र स्वस्त वार्षिक योजना जाहीर करण्यात आली आहे.

जगभरातील राजकारणी, प्रसिद्ध व्यक्ती, पत्रकार आणि सार्वजनिक क्षेत्रातल्या महत्त्वाच्या व्यक्तींना ट्विटरकडून ब्लू टिक देण्यात येते. त्यामुळे या लोकांचे नेमक्या अकाउंटची माहिती मिळते आणि त्यांच्या फॉलोअर्ससाठीही हे सोयिस्कर ठरतं. पूर्वी ही सेवा विनामूल्य होती. इलॉन मस्क यांनी ट्विटरची मालकी हाती घेतल्यानंतर आता यामध्ये बदल करण्यात आला. ट्विटरच्या ब्लू टिकसाठी सबस्क्रिप्शन फी आकारण्याची घोषणा इलॉन मस्क यांनी केली होती. आता ब्लू टिकसाठी महिन्याला 11 डॉलर्स म्हणजे भारतीय रुपयात जवळपास 900 रुपये मोजावे लागणार आहेत.

हे पण वाचा :-

androidtweeterTwitter Blue