एलन मस्क यांनी घेतला Twitter चा ताबा

सीईओ पराग अग्रवालांसह अनेक अधिकाऱ्यांची हकालपट्टी
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

28 ऑक्टोबर :-  जगातील आघाडीचे मायक्रो-ब्लॉगिंग अॅप असेलेले ट्विटर आता जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलोन मस्क यांच्याकडे आले आहे. सीईओ पराग अग्रवाल  यांच्यासह व्यवस्थापनातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. यामध्ये सीईओ पराग अग्रवाल, सीएफओ नेड सेगल, जनरल काउंसिल सीन एजेट आणि विजया गड्डे, कायदेशीर धोरण, ट्रस्ट आणि सुरक्षा प्रमुखांना काढून टाकले. ट्विटरचे लीगल पॉलिसी प्रमुखांनाही बाहेरचा रस्ता दाखवण्यात आलाय. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं अकाउंट बॅन करणारे हेच सल्लागार होते.

इलॉन मस्क यांनी ट्विटरवर याबद्दलची एक पोस्ट शेअर करत लिहिले की, मी ट्विटर का विकत घेतले आणि जाहिरातीबद्दल मला काय वाटते याविषयी अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत, त्यापैकी बहुतेकजणांनी चुकीचा निष्कर्श काढला आहे. याचे कारण म्हणजे आपल्या भविष्यातील सभ्यतेमध्ये समानता असली पाहिजे. डिजिटल जगतात जिथे वेगवेगळ्या विचारसरणीचे लोक आहेत. या डिजीटल जगात श्रद्धा,हिंसा याव्यतीरिक्त निरोगी चर्चा करू शकतात. यासाठी मी ट्वीटर घेतलं असल्याचे ते म्हणाले.

हे पण वाचा :- 

CEO Parag Aggarwalelon musktweeter