काबुलवर तालीबान्यांचा कब्जा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

वृत्तसंस्था १५ ऑगस्ट: भारतात इकडे ७५ व्या स्वातंत्र दिनाचा जल्लोष सुरु असताणाच तिकडे अफगाणिस्तान मध्ये तालिबानच वर्चस्व वाढत चालले आहे.आता तर थेट राजधानी  काबूल शहरापर्यंत तालिबानने धडक मारली आहे

अफगाणिस्तान सरकारच्या हातातून दिवसेंदिवस देशाचा ताबा निसटत आहे. देशाच्या ग्रामीण भागात दबा धरून असलेलं तालिबान काबूल शहरापर्यंत येऊन पोहोचलंय. तालिबानने काबूलच्या बाहेरील भागात प्रवेश केला आहे. अफगाणिस्तान सरकारच्या माहितीनुसार तालिबान सर्व बाजूंनी राजधानीच्या दिशेने वाटचाल करत आहे. अद्याप लढाई सुरू झालेली नाही. दोन दशकांच्या लढाईनंतर अफगाणिस्तानातून अमेरिकन आणि नाटो सैन्याच्या संपूर्ण माघारीपूर्वी तालिबानने सर्व बाजूंनी देशाला व्यापलं असल्याचं अफगाणिस्तानच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. राजधानी काबूलच्या बाहेरील भागात प्रवेश करण्यापूर्वी तालिबानच्या अतिरेकी गटाने रविवारी सकाळी जलालाबादवर कब्जा केला.

अफगाणिस्तानातून येत असलेल्या रिपोर्टनुसार, तालिबानने त्यांच्या समर्थकांना काबूलच्या चहूबाजूनं थांबण्यास सांगितलं आहे. काबूलवर ‘बळाचा वापर करुन’ काबीज करु नये, असे तालिबानकडून त्यांच्या समर्थकांना आदेश देण्यात आले आहेत. यापूर्वी, रविवारी सकाळी सरकारी कार्यालयांतील कर्मचाऱ्यांना अचानक घरी पाठवण्यात आल्याची बातमी आली होती. लष्कराची हेलिकॉप्टर आकाशात फिरू लागली असल्याचंही निदर्शनास आलं. दरम्यान, तालिबानने जलालाबाद ताब्यात घेतल्यानंतर काही तासांनी अमेरिकेची हेलिकॉप्टर रविवारी येथील अमेरिकन दूतावासावर उतरली आहेत.

afganisthanleadnewstalibanattack in kabul