रेल्वे खाली येऊन दोघांची आत्महत्या

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

भोकर, दि. १२ नोव्हेंबर : आदिलाबादहून मुंबईकडे जाणारी नंदिग्राम एक्सप्रेस रेल्वे दि.११ नोव्हेंबर रोजी दुपारी अंदाजे साडेतीन वाजेच्या सुमारास रेल्वेगेट जवळ येताच एक तरुण व एक तरुणी रेल्वे पटरी ओलांडत असताना रेल्वेखाली येवून आल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना भोकर शहरात घडली.

सदर झालेली घटना पहाण्यासाठी एकच गर्दी झाली. शहराच्या मध्यभागी रेल्वे गेट असल्यामुळे या ठिकाणी नागरिकाची ये – जा मोठ्या प्रमाणात असते.

आदिलाबाद – मुंबई हे विशेष रेल्वे गाडी अंदाजे साडेतीन वाजता दुपारी रेल्वे गेट जवळ आली असता हा भयानक अपघात घडला असून रेल्वे प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी येत आहे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव शिवराम क्याटमवार २१ व मुलीचे नाव धारा मोरे रिठा तालुका भोकर असी माहिती मिळाली आहे . दोघांच्या या दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. पुढील तपास रेल्वे पोलीस करीत आहेत.

हे देखील वाचा : 

बेसिन कॅथलिक बँकेची कॅश लुटताना चोरट्याना शिताफीने अटक

घरकुल योजनेत चंद्रपूर जिल्हा देशात अव्वल येण्यासाठी यंत्रणांनी काम करावे – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

 

 

suicide by falling down the trainTwo committed