गडचिरोलीच्या रस्ते-पायाभूत सुविधांना गती देण्याची मागणी

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे गडचिरोलीत आगमन; डॉ. अशोक नेते यांनी केले स्वागत..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

गडचिरोली, दि. २७ : राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या गडचिरोली दौऱ्यादरम्यान माजी खासदार तथा भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोक नेते यांनी त्यांची सदिच्छा भेट घेत पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी जिल्ह्यातील रखडलेली रस्ते व पायाभूत सुविधांची कामे, तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाशी संबंधित विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.

गडचिरोलीसारख्या दुर्गम व आदिवासीबहुल जिल्ह्याच्या विकासासाठी सक्षम पायाभूत सुविधा अत्यावश्यक आहेत. रस्ते, पूल आणि अन्य बांधकामांना गती देतानाच रखडलेली कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी शासनस्तरावर प्रभावी पाठपुरावा करण्याची गरज डॉ. नेते यांनी मंत्री भोसले यांच्या निदर्शनास आणून दिली. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून भरीव निधी आणि आवश्यक त्या उपाययोजना करण्यात याव्यात, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

मंत्री भोसले यांच्या गडचिरोली दौऱ्यामुळे जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकामांच्या प्रश्नांना चालना मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

या वेळी आमदार डॉ. मिलिंद नरोटे, आदिवासी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी, भाजप जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे, माजी आमदार कृष्णा गजबे, महिला मोर्चा प्रदेश सचिव रेखाताई डोळस, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, शहराध्यक्ष तथा सभापती सीमा कन्नमवार, नगरसेविका शिल्पा गव्हारे, ज्ञानेश्वरी धंदरे, अर्चना निंबोंड, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष विलास भांडेकर, आनंद भांडेकर, बंडू झाडे, संजय बारापात्रे, नंदू पेट्टेवार यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments (0)
Add Comment