सावित्रीच्या लेकींना सायकल वाटप

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क ,

अहेरी दि ४ एप्रिल : इयत्ता ८ वी ते १२ पर्यंत शिक्षण घेत असलेल्या आणि शाळेपासून ५ कि.मी अंतरापर्यंत राहणाऱ्या गरजू मुलींना सायकल वाटप करण्याची योजना ‘मानव विकास मिशन ’मार्फत राबविली जात आहे अंतर्गत शिक्षणापासून वंचित राहण्याची अडचण दूर करण्यासाठीराजे धर्मराव विद्यालय वेलगुर मध्ये मुख्याध्यापक के डी रुखमोडे यांच्या मार्गदर्शनात २३ मुलींना सायकलचे वितरण करण्यात आले.
गाव ते शाळा ५ कि.मी अंतरापर्यंत राहणाऱ्या गरजू मुलींना सुविधा व्हावी . मुलींना उच्च शिक्षणाच्या प्रवाहात आणणे, त्यांचे शाळा गळतीचे प्रमाण रोखणे, मुलींच्या बाल विवाहाचे प्रमाण कमी करणे यांसारख्या महत्त्वाच्या उद्देशाने महाराष्ट्र मानव विकास निर्देशांक मिशन गाव ते शाळा या दरम्यान सर्व मुलींना मोफत सायकल वाटप करण्याची योजना आहे . राज्यातील १२५ अतिमागास तालुक्यांमध्ये  मानव विकास निर्देशांक उंचावण्यासाठी सुरू झालेल्या मानव विकास योजनेचा जिल्ह्यातील शाळांमधून शिक्षण घेत असलेल्या मुलीं फायदा घेत आहेत.

शैक्षणिक प्रगती पासून वंचित राहिलेल्या विद्यार्थिनींचा विचार करून आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक सुरक्षितता देऊन त्यांच्या कौशल्यात वाढ करणाऱ्या मानव विकास योजनेला प्रतिसाद देऊन राजे धर्मराव विद्यालय वेलगुरातील वर्ग आठवीच्या २३ विद्यार्थिनींना सायकली मुलींच्या स्वाधीन करण्यात आले .

या प्रसंगी वेलगूर ग्रामपंचायतचे उपसरपंच ऊमेश मोहुर्ले, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विजय मोहुर्ले , ग्रामपंचायत सदस्या कु.सुमताई दुधी , मुख्याध्यापक के.डी.रूखमोडे, प्रशांत येवले ,एन.डी.झोडे, प्रशांत कुंडू,सि.व्हि.चांदेकर, विजय दंडारे, संजय गरमडे , व्हि.एफ.चांदेकर, अक्षय दिवसे , सुधाकर मडावी उपस्थित होते

हे देखील वाचा ,

पत्रकार कल्याणासाठी स्वतंत्र महामंडळाची गरज – अनिल मस्के

नागेपल्ली येथील मुख्याध्यापक धीरज महंत यांचा सेवानिवृत्तीपर सत्कार व निरोप

जुनं प्रेम पुन्हा फुलविण्यासाठी प्रियकराने विवाहित प्रेयसीच्या अल्पवयीन चिमुरड्याचे केले अपहरण

एन.डी.झोडेके.डी.रूखमोडेप्रशांत कुंडूप्रशांत येवलेसि.व्हि.चांदेकर