निरोगी आणि सूद्ढ भारतासाठी सूर्यनमस्कार उपयुक्त – डॉ. प्रशांत बोकारे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गडचिरोली दि. ९ फेब्रुवारी :  नियमितपणे सूर्यनमस्कार घातले जावेत; कारण थंडीमध्ये सूर्याद्वारे मिळणारी उष्णता आणि ऊर्जा शरीराला लाभदायक आहे. सूर्यनमस्कार ही आसनांची एक मालिका आहे, ज्याद्वारे शरीरातील प्रत्येक भागाला व्यायाम मिळतो. हाताचे मनगट, कोपरे, खांदे, पाठीचा कणा, गुडघे, पायाचे घोटे अशा सर्व सांध्यांना सूर्यनमस्कारामुळे फायदा मिळतो. शरीराची चपळता, स्फूर्ती वाढते. निरोगी आणि सुदृढ भारतासाठी सूर्यनमस्कार आवश्यक आहे असे. प्रतिपादन कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी गडचिरोलीत सूर्यनमस्कार कार्यक्रमात केले.

ते पुढे म्हणाले, शरीर संवर्धनासाठी सूर्यनमस्कार उपयुक्त आहेत. शरीरातील रक्त शुद्ध करण्यासाठीही सूर्यनमस्कार अतिशय फायदेशीर आहेत. आजच्या या सूर्यनमस्कारामुळे देशातील ७५ करोड सूर्यनमस्कारां यामध्ये या माध्यमातून योगदान होईल असेही ते म्हणाले.

या कार्यक्रमाचे आयोजन संचालक क्रीडा व शारीरिक शिक्षण विभाग अनिता लोखंडे, संचालक राष्ट्रीय सेवा योजनेचे डॉ. श्याम खंडारे, संचालक विद्यार्थी विकास डॉ. शैलेंद्र देव यांच्या वतीने करण्यात आले होते.  स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त गोंडवाना विद्यापीठाच्या परीसरात मंगळवारी दि. ८ फेब्रुवारी २०२२ रोजी सामूहिक सूर्यनमस्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

यावेळी मंचावर गोंडवाना विद्यापीठाचे कूलगुरु डॉ. प्रशांत बोकारे, प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल झेड. चिताडे, विज्ञान व तंत्रज्ञान अधिष्ठाता डॉ. सुरेश रेवतकर, पतंजली योगचे सत्यनारायण अदमनवार, आनंदवनचे क्रीडाशिक्षक तानाजी बायस्कर आदिंची उपस्थिती होती.

गोंडवाना विद्यापीठाशी संलग्नित राष्ट्रीय सेवा योजनचे विद्यार्थी, पदव्युत्तर शैक्षणिक विभागातील सर्व विद्यार्थी, शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते. क्रीडाशिक्षक तानाजी बाविस्कर यांच्या मार्गदर्शनात हा सामूहिक सूर्यनमस्काराचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. अनीता लोखंडे यांनी केले तर आभार डॉ. श्याम खंडारे यांनी मानले.

हे देखील वाचा : 

गोंडवाना विद्यापीठाकडून गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अपर्ण

धक्कादायक! चारित्र्याच्या संशयातून पत्नीवर धारदार शस्त्राने सपासप वार! पतीविरोधात गुन्हा दाखल

महापारेषणच्या ४०० केव्ही टॉवर लाईनमध्ये बिघाड

 

 

lead news