थंडीत सर्दी, खोकल्यासाठी करा घरगुती उपाय

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

वातावरणात बदल झाले की त्याचे परिणाम शरीरावर देखील होउ लागतात. थंडीच्या दिवसात तर शरीरात असे बदल नेहमी जाणवतात. अचानक झालेल्या बदलामुळे सर्दी, खोकला, ताप, अंगदूखी यासारखे आजार होणे हे स्वाभाविक लक्षण आहे. जरी हे आजार जास्त काळ टिकणारे नसेल तरी या दिवसांत मात्र आपले शरीर पूर्णपणे कोमेजूर जाते. थकवा जाणवतो. सर्दी, खोकल्यासाठी अनेकजण एलोपॅथीच्या औषधांचा उपयोग करतात तर काही जण घरगुती उपायांनी आजार बरा करतात.

तुम्हाला विषाणू आणि घसादुखीचा त्रास होत असेल तर एक ग्लास पाण्यात एक चमचा हळद टाकून ते चांगले उकडून घ्यावे, त्यानंतर दिवसातून 2 ते 3 वेळा गुळण्या कराव्यात. यामुळे तुम्हाला खुप आराम मिळेल आणि असे केल्याने संसर्ग ही निघून जाईल. त्याचबरोबर अर्धा चमचा हळद आणि आले पावडर, काळी मिरी पावडर आणि एक चमचा मध एकत्र करून दिवसातून 2 ते 3 वेळा सेवन करा. याने कफ पासून सूटका होते.

2 ग्लास पाण्यात 5 ते 10 तुळशीची पाने, 5 ते 7 पुदिन्यांची पाने, एकचमचा कॅरम दाणे, अर्धा चमचा मेथी, अर्धा चमचा हळद घेउन मध्यम आचेवर 10 मिनीट उकळा. मग त्याचे सेवन केल्याने त्वरीत आाराम मिळतो. रात्री खुप खोकला होत असेल तर झोपण्यापूर्वी मिठाच्या पाण्याने गुळण्या करा. यामुळे आराम मिळेल. मधाबरोबर लिंबूचे सेवन केल्याने रात्री होणार्या खोकल्यापासून आराम मिळतो.

हे पण वाचा :-

cough in winterDo homefor coldRemedies