घरगुती उपाय करून घालवा डेड स्किन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

त्वचेवर डेड सेल्स जमा झाल्या की त्वचा एकदम कोरडी आणि निर्जिव दिसू लागते. यासाठी आपण वेळोवेळी चेहर्यावरील डेड स्किन काढून टाकली पाहिजे. चेहर्यावरील डेड स्किन वेळीच काढून टाकल्याने त्वचेचा वरील भाग स्वच्छ होतो. त्याच शिवाय रक्ताभिसरण ही चांगले राहते. एक्सफोलिएशनच्या मदतीने जेव्हा चेहर्यावरील डेड स्किन काढून टाकतो तेव्हा याखालील निरोगी पेशी देखील वर येतात. या निरोगी पेशी आपल्या चेहर्याला चमकणारा लुक देतात. चेहर्यावरील डेड स्किन काढून टाकण्यासाठी तुम्ही घर एक्सफोलिएट करू शकता. ज्यासाठी घरातील वस्तुंची मदत घेतली जाउ शकते.

चेहर्यावरील डेड स्किन काढून टाकण्यासाठी घरातील साखर आणि मध खुप फायदेशीर आहेत. साखर एका स्क्रब प्रमाणे काम करते आणि मध त्वचेला ओलावा देते. यासाठी एक चमचा मध आणि फक्त एक चमचा साखर मिसळा. आता ही पेस्ट चेहर्यावर लावा आणि थोड्यावेळात हलक्या हातांनी मालिश करा. यानंतर पाण्याने चेहरा धुवा. आठवड्यातून एकदा डेड सेल्स काढून टाकण्यासाठी तुम्ही हा घरगुती उपाय करू शकता.

चेहर्यावरील डेड स्किन काढून टाकण्यासाठी दोन चमचे ओटमील पीठ घ्या आणि नंतर त्यात थोडे पाणी घाला. याची पेस्ट तयार झाल्यानंतर हलक्या हातांनी ही पेस्ट चेहर्यावर लावा. साधारण 5 मिनिटांनंतर पाण्याने चेहरा धुवा. आठवड्यातून एकदा हा उपाय करून पहा.

डागविरहीत चेहर्यासाठी बेकिंग सोडा खुप फायदेशीर आहे. व्हिटॅमिन ई कॅप्सूल मिसळल्यास याचा फायदा अधिक दिसून येतो. एक चमचा बेकिंग सोडा घ्या आणि त्यात व्हिटॅमिन ईच्या एका कॅप्सूलचे तेल मिसळा. ही कॅप्सूल केमिस्टच्या दुकानात सहज मिळेल. आता या दोन्ही गोष्टींमध्ये थोडेसे पाणी मिसळून पेस्ट बनवा आणि सुमारे 3 मिनिट चेहर्यावर हलक्या हातांनी मालिश करा. यानंतर पाण्याने चेहरा धुवा.

काॅफीच्या सहाय्याने चेहरा खुलवण्यास मदत होते. यासाठी दोन ते तीन चमचे काॅफी पावडर घ्यात आणि त्यात एक चमचा नारळ तेल मिसळा. पेस्ट तयार करण्यासाठी थोडेसे पाणी ही घालु शकता. आता हलक्या हातांनी ही पेस्ट चेहर्यावर लावा आणि मग सामान्य पाण्याने चेहरा धुवा.

हे देखील वाचा :-

Get ridof dead skinRemedieswith home