राज्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता कमी, राज्य सरकारची पूर्ण तयारी :आरोग्यमंत्री राजेश टोपे.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

राज्यात कोरोनाचा कहर हळूहळू कमी होताना दिसत आहे. मात्र कोरोनाची रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट होत असली तरी कोरोनाची दुसरी लाट येऊ शकते असा अंदाज अनेकजण व्यक्त करत आहेत. मात्र राज्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता कमी आहे. आणि कोरोनाची दुसरी आली तरी राज्य सरकार पूर्ण तयारीत असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

युरोपीयन देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. त्यामुळे त्या देशांत पुन्हा लॉकडाऊन करण्यात आलं आहे. त्यामुळे देश आणि राज्यातही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची भीती व्यक्त केली जाती आहे. मात्र राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता कमी असून आली तरी राज्य सरकारची पूर्ण तयारी असल्याची माहिती टोपे यांनी दिली आहे. त्याचबरोबर याआधी लग्नसमारंभात पन्नास लोकांना परवानगी दिली होती त्यांच्या संख्येत वाढ करण्याचा विचार सरकार करत असल्याचंही टोपे यांनी म्हंटलं आहे. तर मंदिरं उघडण्याबाबतचा निर्णय हा दिवाळीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चर्चा करून घेतील अशी माहितीही राजेश टोपे यांनी दिली आहे.

मुंबईकरांसाठी दिलासा, आजपासून 244 ठिकाणी कोरोनाची मोफत चाचणी.

कोरोना व्हायरसचा सर्वाधिक प्रादुर्भाव असलेल्या मुंबईत आता कोरोना चाचणी मोफत होणार आहे. मुंबई महापालिकेकडून आजपासून 244 ठिकाणी मोफत कोरोना चाचणीची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे कोरोनाची लक्षणे असल्यास नागरिक महापालिकेच्या हेल्पलाईनवर किंवा 1916 या क्रमांकावर संपर्क साधून जवळच्या केंद्राची माहिती घेऊन तिथे मोफत कोरोनाची चाचणी करु शकतात. मुंबईत आतापर्यंत केवळ 54 ठिकाणी कोरोनाची चाचणी केली जात होती. मुंबई महापालिकेच्या अखत्यारित येणारे येणारे विविध दवाखाने, रुग्णालयांसह एकूण 244 ठिकाणी आजपासून मोफत वैद्यकीय चाचणी होणार आहे. त्यामुळे मोफत कोरोना चाचणीच्या ठिकाणींची संख्या वाढून जवळपास 300 होणार आहे. काही ठिकाणी आरटीपीसीआर पद्धतीची वैद्यकीय चाचणी; तर उर्वरित ठिकाणी अटीजेन (Antigen) आधारित वैद्यकीय चाचणी उपलब्ध असणार आहे.

covid second stagRajesh Tope