अहेरीत कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचे भीक मांगो आंदोलन

आरोग्य अभियानात कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांचे नियमित सेवेत समायोजन या मुख्य मागणीसाठी २५ ऑक्टोबरपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू...

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोलीतील  अहेरी, भामरागड,एटापल्ली, सिरोंचा ,तालुक्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियानात कार्यरत असलेल्या कर्मचार्याना  राज्य शासनांनी कायमस्वरुपी सेवेत समायोजन करण्यात यावे. यासाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांनी अनेकवेळा पत्र व्यवहार तसेच आंदोलन करून लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला मात्र प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याने शेवटी  दि,२५ ऑक्टोबर २०२३ पासून कायम स्वरुपी सेवेत कायम करण्यासाठी आंदोलन सुरु असून तब्बल २९ दिवस पूर्ण झाले आहे .मात्र  प्रशासनांनी दखल घेत नसल्याने भीक मागो आंदोलन करून लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला .

गडचिरोली दि,२३ : अहेरी येथे राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी अधिकारी व कर्मचारी यांनी २२ नोव्हेंबरला भीक नांगो आंदोलन केले. कायमस्वरुपी सेवेत घ्या, या मागणीबाबत अद्याप नोडगा न निघाल्याने कर्मचाऱ्यांनी येथे भीक मागो आंदोलन करून लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

राष्ट्रीय आरोग्य अभियानात कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांचे नियमित सेवेत समायोजन या मुख्य मागणीसाठी २५ ऑक्टोबरपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू आहे. २२ नोव्हेंबरच्या भीक मांगो आंदोलनात अहेरी उपविभागातील भामरागड, एटापल्ली, सिरोंचा येथील कंत्राटी आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. शहरातील मुख्य बाजारपेठ भागात कर्मचाऱ्यांनी भीक मांगो आंदोलन केले.

आंदोलन दरम्यान, आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे अहेरी उपविभागातील ६ प्राथमिक आरोग्य केंद्रे व ३६ पैकी २० उपकेंद्रे बंद पडली आहेत. त्यामुळे नक्षल ग्रस्त आदिवासी भागातील आरोग्य यंत्रणा कोळमळली असल्याने शासनांनी तत्काळ कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांचे समायोजन करून आरोग्य सेवा सुरळीत करण्याची मागणी जोर धरू  लागली आहे.

हे देखील वाचा ,

अकोला- अमरावती महामार्ग निर्मितीचा गिनीज विश्व विक्रम भारतमातेच्या चरणांशी समर्पित – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

कोरेगाव भीमा पंचक्रोशीतील ग्रामस्थ आंबेडकरी अनुयायांचे करणार भव्य स्वागत – सर्जेराव वाघमारे

ग्रामपंचायत निवडणुकांतील उमेदवारांनी तीस दिवसांत ट्रू व्होटर ॲपद्वारे निवडणूक खर्च सादर करणे आवश्यक

अन्न व औषध मंत्रीआरोग्य मंत्रीआरोग्य विभागपालकमंत्री गडचिरोली