अहेरीत कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचे भीक मांगो आंदोलन
आरोग्य अभियानात कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांचे नियमित सेवेत समायोजन या मुख्य मागणीसाठी २५ ऑक्टोबरपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू...
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली दि,२३ : अहेरी येथे राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी अधिकारी व कर्मचारी यांनी २२ नोव्हेंबरला भीक नांगो आंदोलन केले. कायमस्वरुपी सेवेत घ्या, या मागणीबाबत अद्याप नोडगा न निघाल्याने कर्मचाऱ्यांनी येथे भीक मागो आंदोलन करून लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
राष्ट्रीय आरोग्य अभियानात कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांचे नियमित सेवेत समायोजन या मुख्य मागणीसाठी २५ ऑक्टोबरपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू आहे. २२ नोव्हेंबरच्या भीक मांगो आंदोलनात अहेरी उपविभागातील भामरागड, एटापल्ली, सिरोंचा येथील कंत्राटी आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. शहरातील मुख्य बाजारपेठ भागात कर्मचाऱ्यांनी भीक मांगो आंदोलन केले.
आंदोलन दरम्यान, आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे अहेरी उपविभागातील ६ प्राथमिक आरोग्य केंद्रे व ३६ पैकी २० उपकेंद्रे बंद पडली आहेत. त्यामुळे नक्षल ग्रस्त आदिवासी भागातील आरोग्य यंत्रणा कोळमळली असल्याने शासनांनी तत्काळ कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांचे समायोजन करून आरोग्य सेवा सुरळीत करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
हे देखील वाचा ,
कोरेगाव भीमा पंचक्रोशीतील ग्रामस्थ आंबेडकरी अनुयायांचे करणार भव्य स्वागत – सर्जेराव वाघमारे
ग्रामपंचायत निवडणुकांतील उमेदवारांनी तीस दिवसांत ट्रू व्होटर ॲपद्वारे निवडणूक खर्च सादर करणे आवश्यक
Comments are closed.