Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

“त्या” रानटी हत्तीच्या हल्ल्यात तीन महिला गंभीर

0

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली जिल्ह्यात रानटी हत्तीने पुन्हा धुमाकूळ घातला असून भामरागड तालुक्यातील कियर येथील एका शेतकऱ्यास दुपारी ठार केल्यानंतर रात्री त्याच रानटी हत्तीने हिदूर गावात धुडगूस घालून तीन महिलांना गंभीर जखमी केले. महारी देवू वड्डे (५०), राजे कोपा आलामी (५०) आणि वंजे जुरू पुंगाटी अशी जखमी महिलांची नावे आहेत. यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.तर दुसरीकडे दक्षिण गडचिरोलीत नासधूस दरम्यान, सात ते आठ रानटी हत्तींचा एक कळप गडचिरोली तालुक्यात धुडगूस घालत आहे. पोर्ला वनपरीक्षेत्रात  असलेल्या या कळपाने आपला मुक्काम आंबेशिवणीकडे हलविला. तेथे जंगलात धुडगूस घातल्यानंतर आता हत्तींनी आंबेशिवणीकडे धाव घेतली. तेथे उन्हाळी धानासह भाजीपाला पिकांचे आतोनात नुकसान झाले आहे.

गडचिरोली दि,२६ : जिल्ह्यात रानटी हत्तीने पुन्हा धुमाकूळ घातला असून भामरागड तालुक्यातील कियर येथील एका शेतकऱ्यास दुपारी ठार केल्यानंतर रात्री त्याच रानटी हत्तीने हिदूर गावात धुडगूस घालून तीन महिलांना गंभीर जखमी केले असून मोठ्या प्रमाणात नुकसान करीत आहेत .वन विभागासह नागरिकाना जेरीस आणले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

नुकतेच भामरागड तालुक्यातील कियर येथील एका शेतक-यास दुपारी ठार केल्यानंतर रात्री “त्या” जंगली हत्तीने हिदूर गावात धुडगूस घालून पुन्हा तीन महिलांना गंभीर जखमी केले. महारी देवू वड्डे (वय ५०), राजे कोपा आलामी (५०) आणि वंजे जुरू पुंगाटी अशी जखमी महिलांची नावे आहेत. तर याच जंगली हत्तीने तेलंगणा राज्यात दोन शेतकऱ्यांना ठार करून तीन दिवसांपूर्वी रानटी हत्तीने भामरागड तालुक्यात प्रवेश केला. काल पहाटे या तालुक्यातील कोसफुंडी गावात सर्वप्रथम हत्तीचे दर्शन झाले.त्यानंतर तो कारमपल्ली-टेकला जंगलात गेला. त्यानंतर दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास कियर येथील शेतशिवारात काम करीत असलेल्या गोंगलू तेलामी नामक शेतक-यास हत्तीने ठार केले.

त्यानंतर हा हत्ती त्या भागातून पसार होऊन आरेवाडा परिसरातील हिदूर या गावात गेला. सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास त्याने महारी वड्डे, राजे आलामी व वंजे पुंगाटी यांना गंभीर जखमी केले.तिन्ही महिलांना भामरागड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र दुखापत गंभीर स्वरूपाची असल्याने त्यांना चंद्रपूरच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे. एका महिलेचे दोन्ही पाय व पोटाला गंभीर इजा झाल्याने तिची प्रकृती चिंताजनक आहे, तर दोघींना कायम अपंगत्व येण्याचा प्राथमिक अंदाज वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा,

रानटी हत्तींचा उच्छाद! “त्या” रानटी हत्तीने घेतला तिसरा इसमाचा बळी..

Leave A Reply

Your email address will not be published.