Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

स्फोटकांनी भरलेले 03 क्लेमोर पाईप्स, डिटोनेटरने भरलेले 06 प्रेशर कुकर, गडचिरोली पोलिसांनी केला नष्ट

नक्षलग्रस्त टिपागड टेकडी परिसरात विशेष नक्षलविरोधी पथक, केंद्रीय राखीव पोलीस दल, जलद प्रतिसाद पथक आणि बॉम्ब शोधक व नाशक पथकाने ही कारवाई पार पाडली.

0

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

 गडचिरोली दि ०६ : लोकसभा निवडणुकीदरम्यान नक्षल्यांनी टिपागड पहाडावर दडवून ठेवलेली शक्तीशाली स्फोटके पोलिसांनी आज (सोमवार) सकाळी हुडकून काढली. नक्षलग्रस्त टिपागड टेकडी परिसरात विशेष नक्षलविरोधी पथक, केंद्रीय राखीव पोलीस दल, जलद प्रतिसाद पथक आणि बॉम्ब शोधक व नाशक पथकाने ही कारवाई पार पाडली. यामुळे मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा घातपात करण्याचा नक्षल्यांचा कट फसला असून गडचिरोली पोलिसांना यश आले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात १९ एप्रिलला गडचिरोली -चिमूर लोकसभा क्षेत्राची निवडणूक झाली. या निवडणुकीदरम्यान नक्षल्यांनी टिपागड परिसरात स्फोटके दडवून ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. परंतु त्यावेळी ही स्फोटके पोलिसांना सापडली नाहीत. शिवाय मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त असल्यामुळे नक्षल्यांनाही घातपात करता आला नाही.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

मात्र गडचिरोली पोलिसांना काल स्फोटके असल्याची खात्रीशिर माहिती मिळाल्यानंतर सी-६० पोलिस आणि केंद्रीय राखीव दलाचे जलद प्रतिसाद पथक तसेच बॉम्ब शोधक व नाशक विभागाचे दोन पथक टिपागड परिसरात पाठविण्यात आले.

या पथकातील जवानांनी पहाडावर दडवून ठेवलेली स्फोटके, क्लेमोर माईन्स आणि प्रेशर कुकर्स हुडकून काढण्यात आले.पोलिसांना घटनास्थळी स्फोटकांनी भरलेली ६ प्रेशर कुकर्स, डेटोनेटर्स, स्फोटके असलेली ३ क्लेमोर माईन्स आणि ३ रिकामी क्लेमोर माईन्स आढळून आली. शिवाय गन पावडर, ब्लँकेट आणि औषधेही तेथे सापडली. त्यानंतर बॉम्ब शोधक व नाशक पथकाच्या पोलिसांनी ही स्फोटके आणि क्लेमोर माईन्स नष्ट केली, अशी माहिती पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी दिली.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.