Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

कोरेगाव भीमा पंचक्रोशीतील ग्रामस्थ आंबेडकरी अनुयायांचे करणार भव्य स्वागत – सर्जेराव वाघमारे

अमेरिका, इंग्लंड व श्रीलंकेसह यावर्षी परदेशी नागरिकही मोठ्या संख्येने होणार सहभागी ....

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

पुणे दि,२३ : भीमा कोरेगाव येथे दरवर्षी १ जानेवारी रोजी लाखो आंबेडकरी अनुयायी विजय स्तंभास मानवंदना देण्यासाठी येत असतात. कोरेगाव भीमा, पेरणे गाव यासह परिसरातील सरपंच, सर्व पक्ष, संघटनाचे प्रमुख तसेच ग्रामस्थ विजय स्तंभास येणाऱ्या अनुयायांचे स्वागत अतिशय भव्य स्वरूपात करणार असल्याचे कोरेगाव भीमा विजय रणस्तंभ सेवा संघाचे अध्यक्ष सर्जेराव वाघमारे यांनी सांगितले आहे.

भीमा कोरेगाव येथे दरवर्षी येणाऱ्या प्रत्येकाला गुलाब फूल देऊन स्वागत करणार आहेत. तसेच, ठिकठिकाणी स्वागत कमानी लावून स्वागत करणार आहेत. अनुयायांना विविध प्रकारे मदत आणि सहकार्य ग्रामस्थ करणार असून यावर्षी मोठ्या प्रमाणात कोरेगाव भीमा परिसरातील ग्रामस्थ आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. तसेच दरवर्षी प्रमाणे याही वर्षी कोरेगाव भीमा विजय स्तंभ सेवा संघाच्या वतीने जयस्तंभास मानवंदना देण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक पक्ष प्रमुख व संघटनेचे प्रमुख व्यक्तींचा मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात येणार आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

शिवाय कोरेगाव भीमा विजय जयस्तंभ सेवा संघ चे वतीने स्टॉल धारकांना योग्य जागा देण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. तसे मा. राजेश देशमुख साहेब, जिल्हाधिकारी पुणे व संबंधीत अधिकारी यांचे बरोबर चर्चा करून लवकरच निर्णय होईल. यावर्षी प्रथमच कोरेगाव भीमा विजय रणस्तंभ सेवा संघाचे वतीने जयस्तंभ चे प्रतिकृतीचे दोन सेल्फी पॉईंट पूर्व आणि पश्चिम बाजूला तयार करण्यात येणार आहे. त्याचा येणाऱ्या अनुयायांनी लाभ घेतला जावा. त्याबरोबरच कोरेगाव भीमा विजय रणस्तंभ सेवा संघाच्या वतीने कोरेगाव भीमा जयस्तंभाचा इतिहास व माहिती फलक ठराविक ठिकाणी शासनाची परवानगी घेऊन लावण्यात येणार आहे.

दि. ३१ डिसेंबर सायंकाळी ८ ते ११ वाजेपर्यंत बुध्द धम्म व छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचाराचे प्रबोधन पर कार्यक्रम होईल. रात्री १२ वाजता दरवर्षी प्रमाणे फटाक्याची अतिशबाजी करून विजयोत्सव साजरा करण्यात येणार आहे. नंतर भंते ज्ञानज्योती व मान्यवरांच्या उपस्थितीत सामुदायिक बुध्द वंदना घेण्यात येईल. १२ नंतर भंते ज्ञानज्योती यांचा धम्म देसना कार्यक्रम १ जानेवारी २०२४ पहाटे ५ वाजेपर्यंत चालू राहील. सकाळची बुध्द वंदना भारतीय बौध्द महासभा व समिती यांच्या वतीने घेण्यात येणार आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

सकाळी सहा वाजता रिपब्लिकन सेना यांचे महाराष्ट्र अध्यक्ष विवेक बनसोडे व रिपब्लिकन कामगार आघाडीचे अध्यक्ष युवराज बनसोडे यांचे वतीने “शौर्य पहाट” हा कार्यक्रम होईल. याचे उद्घाटन सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांचे हस्ते होईल. सकाळी रिटायर महार रेजिमेंटचे महाराष्ट्रातील हजारो सैनिक जयस्तंभास मानवंदना देतील. २ डिसेंबर २०२४ रोजी दरवर्षी प्रमाणे व जय स्तंभ परिसर स्वच्छता मोहीम राबवली जाईल. यामध्ये पेरणे ग्रामपंचायत व कोरेगाव ग्रामपंचायतीचे सरपंच सर्व पदाधिकारी कर्मचारी उपस्थित असतील. मानवंदना देण्यासाठी येणाऱ्या हजारो अनुयायांना २६ डिसेंबर ते ३१ डिसेंबर पर्यंत निवासाची व्यवस्था व भोजनाची व्यवस्था कोरेगाव भीमा विजय रणस्तंभ सेवा संघाच्या वतीने करण्यात येणार आहे, याचा लाभ येणाऱ्या अनुयायांनी घ्यावा असे आवाहन सर्जेराव वाघमारे यांनी केले आहे.

यावर्षी जयस्तंभास मानवंदना देण्यासाठी देशभरातून अंदाजे २५ लाख लोक येतील असा अंदाज घेऊन प्रशासन व कोरेगाव भीमा विजय रणस्तंभ सेवा संघ तसेच सर्व आंबेडकरी पक्ष संघटना मिळून येणाऱ्या नागरिकांना नागरी सुविधा मिळाव्यात म्हणून प्रयत्न करत आहेत. या पत्रकार परिषदेस सर्जेराव वाघमारे अध्यक्ष, कोरगाव भीमाचे सरपंच विक्रम गव्हाणे, तसेच पेरणे गावच्या सरपंच सौ. उषाताई वाळके तसेच समीर जाधव व निलेश गायकवाड आदी उपस्थित होते.

हे देखील वाचा ,

दारूचे दुष्परिणाम दिसतात ८३ रुग्णांची तालुका क्लिनिकला भेट

कोकणातील गृहिणी बनली मसाला क्वीन

Comments are closed.