Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

दारूचे दुष्परिणाम दिसतात ८३ रुग्णांची तालुका क्लिनिकला भेट

तज्ञांकडून समुपदेशन ...

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली दि,२३ : गडचिरोली सारख्या दुर्गम जिल्ह्यात व्यसनी रुग्णांना उपचार उपलब्ध व्हावे, या साठी बाराही तालुका पातळीवर मुक्तिपथतर्फे व्यसन उपचार क्लिनिक सुरु आहे. मागील आठवडाभरात एकूण ८३ रुग्णांनी तालुका क्लिनिकच्या माध्यमातून उपचार घेतला.
दारूचे व्यसन असलेल्या रुग्णांना काही दिवसांनंतर शारीरिक, मानसिक बदल दिसून येतात. अशा रुग्णांना तत्काळ उपचार घेणे गरजेचे असते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

पूर्वी गडचिरोली जिल्ह्यात ही उपचाराची सुविधा उपलब्ध नसल्याने रुग्णांना मोठ्या शहरात जाऊन महागडे उपचार घेणे शक्य नव्हते. ही बाब लक्षात घेऊन मुक्तिपथ अभियानातर्फे जिल्ह्यातील बाराही तालुका पातळीवर नियोजित दिवशी तालुका क्लिनिक सुरु करण्यात आली. आतापर्यंत अनेक रुग्णांनी या क्लिनिकच्या माध्यमातून उपचार घेत दारूच्या व्यसनाला दूर सारले आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

विशेष म्हणजे क्लिनिकला भेट दिलेल्या रुग्णांना तज्ज्ञांकडून योग्य समुपदेशनासह औषोधोपचार देखील केले जाते. इतकेच नव्हे तर एकदा उपचार घेतलेल्या रुग्णांना पाठपुरावा घेत त्यांची सद्यस्थिती जाणून घेतली जाते. त्यामुळे रुग्णांना दारूच्या व्यसनातून मुक्त होण्यास मदत मिळते. मागील आठवड्यात आरमोरी १५, एटापल्ली १६, सिरोंचा १४, चामोर्शी ७, अहेरी ७, मुलचेरा १४, कुरखेडा १० अशा एकूण ८३ रुग्णांनी क्लिनिकचा लाभ घेतला .

हे देखील वाचाः 

कोकणातील गृहिणी बनली मसाला क्वीन

बिबी येथे दिव्यग्राम – २०२३ महोत्सव : मेधा पाटकर यांना जीवनगौरव, सारंग बोबडे यांना सेवार्थ पुरस्कार प्रदान

Comments are closed.