Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

दारूविक्री बंदीसाठी ग्रामस्थांनी एकत्र यावे

गडचिरोलीतील जुनी वाकडी येथे सघन बैठक संपन्न ...

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली दि,23 : चामोर्शी तालुक्यातील जुनी वाकडी येथे मुक्तिपथ व गाव संघटनेच्या संयुक्त विद्यमाने सघन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अवैध दारूविक्रीबंदीच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासह विविध उपक्रम घेण्यात आले. सोबतच सरपंच यांनी अवैध दारूविक्री बंदीसाठी गावातील लोकांनी एकत्र येण्याचे आवाहन केले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

जुनी वाकडी येथे सघन गाव भेट कार्यक्रम अंतर्गत गावातील दारूबंदी व्हावी, या उद्देशाने  स्टेक होल्डर सभा आयोजित करण्यात आली. स्पर्धेचे महत्त्व मुक्तीपथ चे तालुका प्रेरक विनोद पांडे यांनी सांगितले. त्यानंतर मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत 25 महिला व 24 पुरुष यांनी सहभाग घेतला. या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी गावातील जवळपास 250 लोक उपस्थित होते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

मॅरेथॉन स्पर्धेचे मुख्य उद्देश, नियम व अटी तालुका संघटक आनंद इंगळे यांनी सांगितले. त्यानंतर स्पर्धेत विजयी झालेल्या स्पर्धकांना बक्षीस वितरण करून व दारू बंदीच्या घोषणा देवून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी सरपंच भाग्यश्री मंगर, उपसरपंच अंतकला प्रकाश मडावी, तंटामुक्ती अध्यक्ष, आशा वर्कर, ग्रामपंचायत सदस्य व मुक्तीपथ गाव संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

हे देखील वाचा, 

Comments are closed.