पल्स पोलिओ लसीकरणाचा राजाराम येथे पं. स. सभापती भास्कर तलांडे यांच्याहस्ते शुभारंभ

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

अहेरी, दि. २७ फेब्रुवारी : जिल्हा आरोग्य प्रशासन गडचिरोली यांच्यावतीने आज अहेरी तालुक्यातील पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे राजाराम प्राथमिक आरोग्य उपकेंद्र येथे अहेरीचे प.स.सभापती भास्कर तलांडे यांच्याहस्ते शुभारंभ करण्यात आला.

यावेळी ० ते ५ वयोगटातील बालकाला पोलिओ चा डोस पाजून त्यांनी या पोलिओ मोहिमेचे शुभारंभ केला. राजाराम येथे ५८ बालकांंना पोलिओचे डोज पाजण्यात आले.

याप्रसंगी ग्रामपंचायत राजारामचे सरपंच नागेश कन्नाके, उपसरपंचा सुरक्षाताई आकदर, ग्राम पंचायत सदस्या सपना तलांडे, अँड. एच. के. आकदर, वैद्यकीय अधिकारी राजेश मानकर, नामदेव पेंदाम, आरोग्य विभागाचे अधिकारी नितीन धकाते, कुंभारे, रामटेके, व कर्मचारी उपस्थित होते.

हे देखील वाचा : 

पल्स पोलिओ लसीकरणाचा जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी इंदाराम येथून केला शुभारंभ

आलापल्ली येथे महिला व किशोरवयीन मुलींसाठी कार्यशाळेचे आयोजन

 

 

bhaskar talandilead news