अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट ठार

लाखांदूर-वडसा राज्यमार्गावरील घटना, शिकारीसाठी आल्याचा अंदाज
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

लाखांदूर, 20,ऑक्टोबर :-  रात्रीच्या वेळेस शिकारीसाठी जंगला बाहेर येउन गावाच्या दिशेने जाणार्या बिबट्याला एक अज्ञात वाहनाने धडक देल्याने बिबट घटनास्थळीच ठार होण्याची घटना 20 ऑक्टोबर ला सकाळी 4 वाजेच्या सुमारास लाखांदूर-वडसा राज्य महामार्गच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालय परिसरात घडली.

मागील काही दिवसांपासून लाखांदूरच्या विविध परिसरात बिबटचा वावर होण्याच्या चर्चा असून गावकर्यांना बिबट्याचे दर्शन झाल्याचे बोलल्या जात होते. अशातच ही घटना होण्याने गावकर्यांमध्ये भितीचे वातावरण आहे. हा बिबट शिकारीसाठी गावात येत होता. यावेळेस वेगाने येणार्या गाडीच्या धडकेत त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

ही घटना सकाळी समोर आली. घटनेची माहिती स्थानिक वनविभाला देण्यात आली. वनपरिक्षेत्राधिकारी रूपेश गावित, क्षेत्र सहायक आय.जी. निर्वाण, जे.के. दिघोरे, वनरक्षक एस.जी. खंडागले, एम.एस. चांदेवार, कवेट, बो.एस. पाटील, राउत, विकास भुते, पांडूरंग दिघोरे सह अन्य वनकर्मचार्यांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा करून बिबट्याचे शव पोस्टमार्टन करून वनपरिक्षेत्र कार्यालयात दहन केले.

हे देखील वाचा :-

killedlakhandurleopard