महारोगी सेवा समिती तर्फे हेल्पिंग हँड्स अहेरीकडे २०० राशन किट सुपूर्द

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

वरोरा :
महारोगी सेवा समिती वरोरा आनंदवन यांच्या मिशन आनंद सहयोग अंतर्गत कौस्तुभ आमटे आनंदवन यांच्या कडून २०० राशन किट गरीब गरजू साठी अहेरी येथे हेल्पिंग हँड्स संस्था अहेरीकडे उपसरपंच आनंदवन तथा जनसंपर्क अधिकारी आनंदवन शौकत अली खान यांच्या हस्ते आज अहेरी येथे सुपूर्द करण्यात आले.

यावेळी प्रशासनिक अधिकारी पोलीस निरीक्षक प्रवीण डांगे, सहायक पोलिस निरीक्षक बाळासाहेब शिंदे, प्रतिष्ठित नागरिक सुरेशजी बंडावार तथा हेल्पिंग हँड्स संस्था, विठ्ठल रखुमाई विवाह सोहळा समिती चे सर्व कार्यकर्ते, सदस्य आदी उपस्थित होते. यावेळी शौकत अली खान व आनंदवन चे फोटोग्राफर कुलसंगे जी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

एक किट जवळपास २ हजार रु. किमतीची असून अश्या २०० किट या वेळी सुपूर्द करण्यात आल्या. हेल्पिंग हँड्स तर्फे या किट अहेरी परिसरातील अत्यंत गरजू परिवारापर्यंत पोहोचविण्यात येणार आहे.

मोठ्या प्रमाणात किट स्वरूपी मदत मिळवून देण्यासाठी आनंदवन च्या महिला कार्यकर्त्या साबिया दीदी खान यांचा मोलाचा वाटा आहे.

या मदतीसाठी हेल्पिंग हँड्स संस्थेतर्फे आदरणीय डॉ. विकासभाऊ आमटे, कौस्तुभदादा आमटे तथा महारोगी सेवा समिती वरोराचे हार्दिक धन्यवाद मानण्यात आले.

हे देखील वाचा :

धक्कादायक!! आलापल्लीत राहत्या घरी महिलेचा आढळून आला मृतदेह!

कृषी सहाय्यकानी गळफास लावून केली आत्महत्या!

गडचिरोली जिल्ह्यात आज 170 कोरोनामुक्त, एका मृत्यूसह 33 नवीन कोरोना बाधित

 

helpiing handslead story