पुण्यातल्या नवले पुलावरील भीषण अपघातात ७० जण जखमी, तर तब्बल ४८ वाहनांचे नुकसान

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

पुणे, दि. २१ नोव्हेंबर : पुण्यात रविवारी संध्याकाळी झालेल्या एका भीषण रस्ता अपघातात तब्बल ४८ वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. असे अधिकाऱ्यांनी सांगितले. पुणे-बेंगळुरू महामार्गावरील नवले पुलावर हा भीषण अपघात झाला आहे.

एका कंटेनरने धडक दिल्यामुळे या सर्व गाड्या एकमेकांवर आपटत गेल्याची माहिती आहे. या अपघातात ६० ते ७० जण जखमी झाले असून त्यातील सात जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. तर अपघातातील सर्व जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पुणे-बेंगळुरू महामार्गावरील पुण्याजवळील नर्हे स्मशानभूमीच्या बाजूला असलेल्या भूमकर पुलाजवळ साताऱ्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एका ट्रेलरने उतारावर असलेल्या ४८वाहनांना जोरदार धडक दिली.

रस्त्याच्या उतारावर चालकाचे ट्रेलरवरील नियंत्रण सुटल्याने अनियंत्रित ट्रेलर गाड्यांना धडका देत पुढे जात राहिला. या ट्रेलरने पुढे असलेल्या वाहनांना एका पाठोपाठ धडक देत सुमारे ४०० ते ५०० मीटरच्या अंतरातील ४८ हून अधिक वाहनांना धडक दिली. त्यात प्रामुख्याने कारचा समावेश आहे. त्यानंतर ओम लॉजिंगच्या समोरील बाजूला हा ट्रेलर जाऊन थांबला. रविवारच्या सुट्टीमुळे वाहनांची गर्दी असल्यामुळे या भागात संथ गतीने वाहतूक सुरु होती.

हे देखील वाचा : 

रोहा शहरात ऑनलाईन चक्री जुगाराचा धुमाकूळ

 

भारतरत्न इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त भारत जोडो विशेष महिला पदयात्रा उत्साहात

bridgepuneRoad accident