इंग्रजी माध्यमांचे विध्यार्थी फोडा..

गुलाबराव पाटलांचे वादग्रस्त विधान...
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

जळगाव, 05, सप्टेंबर :-  शिक्षक दिनाचा जल्लोष आज देशभर उत्साहात साजरा होत आहे. या उत्साहात अति उत्साही वक्तव्य केलं आहे, राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी.

राजकीय पक्षांप्रमाणे मराठी शाळांनी इंग्रजी माध्यमांचे विध्यार्थी फोडा असे वादग्रस्त विधान करून एक।नवा विषय चर्चेला दिला आहे.

देशभरामध्ये आज शिक्षक दिन उत्साहात साजरा केला जात आहे. जवळपास सगळ्याच शाळांमध्ये शिक्षक दिनानिमित्त वेगेवगेळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे, पण अशाच एका कार्यक्रमात पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. मराठी माध्यमाच्या शाळांची पटसंख्या वाढवायची असेल, तर ज्याप्रमाणे पक्षाचे लोक फोडले जातात, तसं इंग्रजी माध्यमाच्या शाळेचे विद्यार्थी फोडा, असं वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केलं आहे.
आजकालच्या दुनियेत कोण करप्ट नाहीये? सर्वच करप्ट आहे, आजची दुनिया आणि आजकाल आमच्यावरही आरोप चाललेत, सब कुछ ओके आणि ५० खोके. या देशात एकमेव नॉन करप्ट प्राणी म्हणजे शिक्षक असंही गुलाबराव पाटील म्हणालेत.

हे देखील वाचा :-

मॉडेल प्रिझन्स ऍक्ट लवकरच…

अहेरी तालुक्यात मतदान कार्डला आधार जोडणीबाबत प्रत्येक मतदान केंद्रावर विशेष शिबीराचे आयोजन.

Gulabrao PatiljalgaonTeacher's Day