मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना जयंतीनिमित्त अभिवादन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

मुंबई डेस्क दि.०१ ऑगस्ट :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन केले आहे.

मातोश्री निवासस्थानी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

अभिवादन संदेशात मुख्यमंत्री म्हणतात की, लोकशाहीर अण्णा भाऊंनी स्वातंत्र्य संग्राम आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीत मोठे योगदान दिले आहे. कष्टकरी, कामगार आणि शेतकऱ्यांच्या व्यथा- वेदनांना शब्द आणि आवाज देतानाच त्यांनी चळवळीत चैतन्य जागवले.

अस्सल मराठी मातीतील त्यांच्या साहित्याने सातासमुद्रापार ओळख निर्माण केली. महाराष्ट्र सुपुत्र साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊंना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

हे देखील वाचा,

राज्यस्तरीय अवैधरीत्या ऑनलाईन जुगाराचे सक्रिय रॅकेट केले उघड,१० आरोपींना अटक गडचिरोली पोलिसांची कारवाई

…अन..घरात दडून बसलेल्या अस्वलला वन विभागाने जंगलात लावले पळवून

वाघाची शिकार करून कातडी,चार पंजे तस्करी करणाऱ्याला अटक, वन विभागाची मध्यप्रदेशात कारवाई

 

 

 

 

ajit pawarlead newsCM Uddha Thakaray