पुण्यात मध्यरात्रीपासून सीएनजी महागला

दरात प्रति किलो एक रुपयांची वाढ झाली आहे.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

पुणे 16 नोव्हेंबर :-  दिवसेंदिवस महागाई वाढत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मंदीचं सावट आहे. जीवनावश्यक वस्तू महाग होत आहेत. अशा परिस्थितीमध्ये आता CNG चे दर वाढले आहेत. त्यामुळे CNG वापरणाऱ्यांना आता जास्त पैसे द्यावे लागणार आहेत. आधीच महागाईचे चटके बसत असताना दुसरीकडे पुणेकऱ्यांच्या खिशाला आणखी कात्री लागणार आहे. पुण्यात आजपासून सीएनजी गॅस दरात वाढ झाली आहे. पुण्यात सीएनजी दरात  प्रति किलो मागे एक रुपयांची दरवाढ झाली आहे. त्यामुळे पुण्यात आता सीएनजी 92 रुपये प्रति किलो या दराने मिळणार आहे.

महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडने मध्यरात्रीपासून हे दर लागू केले आहेत. पुण्यात एक एप्रिल २०२२ रोजी सीएनजीचा दर ६२.२० रुपये होता. एप्रिल पासून आतापर्यंत सीएनजीच्या दरात 34 रुपयांची वाढ झाली आहे. सीएनजीच्या दरात वाढ झाल्यामुळे वाहन धारक आणि रिक्षा चालकांना फटका बसला आहे.

पुण्यात सीएनजी दरवाढ, पाहा कशी होत गेली दरवाढ

जानेवारी – 66 रुपये 

फेब्रुवारी – 68 रुपये

मार्च – 73 रुपये

एप्रिल – 77.20 रुपये

मे – 80 रुपये

जुलै – 85 रुपये

ऑगस्ट – 91 रूपये

सप्टेंबर – 4 रूपये कपात 87 रूपये

ऑक्टोबर – 4 रूपये वाढ – 91 रूपये

नोव्हेंबर – 92 रूपये

सातत्यानं होणाऱ्या या वाढीमुळं पेट्रोल – डिझेलच्या दरात आणि सीएनजीच्या दरात जास्त अंतर राहिलेले नाही. आधीच मुंबई पुण्यात पेट्रोलसाठी106 रुपये नागरिकांना मोजावे लागत आहे.

हे पण वाचा :-

cng newspunepune cng pricePune CNG Price Hike