कोरोना संसर्ग पसरविणाऱ्या डॉक्टरावर अखेर गुन्हा दाखल!

९९ टक्के फुफ्फुस संसर्ग झालेल्या रुग्णाला अवघ्या दोन दिवसात बरे केल्याचा डॉक्टरचा दावा. कोरोना प्रतिबंधक लसी संबंधी सोशल मीडियावर पसरवला गैरसमज.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

ठाणे : अंबरनाथ तालुक्यातील वांगणी येथे शिल्पा क्लीनिक ह्या खाजगी दवाखान्याच्या डॉ. उमाशंकर गुप्तां आणि त्याच्या महिला सहकारी वर बदलापूर ग्रामीण पोलीस स्थानक अंतर्गत कोरोना काळात कोणतेही नियम न पाळता, मास्क न लावता, सुरक्षिततेची कोणतीही काळजी न घेता कोरोना रुग्णाला एका दिवसात बर करण्याचा दावा करीत समाजमाध्यमावर एक व्हिडीओ वायरल केला होता.

अंबरनाथ तालुक्यातील वांगणी येथील डॉ. उमाशंकर गुप्तां यांच्या क्लिनिक ला कोव्हीड सेंटर म्हणून चालवण्याची मान्यता व कोणतीही प्रशासकीय परवानगी नसतांना देखील त्यांनी आपले क्लिनिकमध्ये कोविड सेंटर थाटले होते. तसेच कोरोना बाधित असलेल्या रुग्णांचा आजार बरा करणार, कोरोना रुग्णांचे ऑक्सिजन लेव्हल बरोबर नियंत्रणात आणणार असा दावा करीत त्यांंच्याकडील औषध देऊन लोकांना फसविण्यासाचे प्रकार सुरु केले होते.

या संदर्भातील संपूर्ण प्रकार लक्षात घेता अंबरनाथचे डॉ. सुनील बनसोडे यांनी पोलीस स्टेशन बदलापूर येथे तक्रार केली. तक्रारीनुसार बदलापूर ग्रामीणचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप निगडे आणि त्यांच्या टीमने घटनास्थळी दाखल होवून डॉ. उमाशंकर गुप्तां यांच्यावर भा.द.वि. कलम २६९/१८८ कोव्हीड उपाय योजना तसेच आपत्ती व्यवस्था २००४ कायदान्वये कलम ५१ अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे. अशी माहिती पोलिस विभागांनी दिली आहे.

हे देखील वाचा :

मासे नेणारा ट्रक तलावात पलटी झाल्याने मासे पकडण्यासाठी नागरिकांची उडाली झुंबड

अवघ्या 15 दिवसांत 3 सख्ख्या भावांचा कोरोनाने निधन, उद्धवस्त झालं कुटुंब

Badlapur Police StationDr. Umashankar Guptalead story