आलापल्लीत भीम जयंती उत्साहात साजरी

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, 

आलापल्ली, दि. १४ एप्रिल : आलापल्ली येथील संघमित्रा बुद्ध विहारामध्ये महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष यांच्या हस्ते निळा ध्वजारोहण करून सुरूवात करण्यात आली.

यानंतर समाजाचे ज्येष्ठ कार्तिक निमसरकार, वामन भगत, भीमराव झाडे, शारदाताई चालुरकर, इंदिरा करमे  यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीप प्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर सामुहिक बुध्द वंदना घेण्यात आली.

या कार्यक्रमात मार्गदर्शक म्हणून स्नेहाताई चालूरकर यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकला व त्यांचे विचार व्यक्त केले. ते म्हणाले “देशाच्या संविधानाचा मसुदा तयार करण्याबरोबरच डॉ.बी.आर. आंबेडकरांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावली. एक अर्थतज्ञ, समाजसुधारक आणि वकील म्हणून त्यांनी भारतातील महत्त्वाच्या चळवळींमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. दलित बौद्ध चळवळीतही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.” अशी माहिती त्यांनी दिली.

त्यानंतर 13 एप्रिल रोजी स्पर्धा परीक्षा व वाचन स्पर्धा घेण्यात आली होती त्या स्पर्धेत प्रथम व द्वितीय क्रमांक पटकवणाऱ्या स्पर्धकांना बक्षीस वितरण करून त्यांचे कौतुक करण्यात आले. यानंतर उपस्थित बौध्द बांधवांना अल्पोपहार वाटप करण्यात आला.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन कांबळे तर आभार दुर्गम सर यांनी केले.

तसेच सायंकाळी भीम रॅली काढण्यात आली यामध्ये असंख्य बौध्द बांधव व भीम सैनिक उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संजय कोंडगुरले, बारशिंगे, दिनेश चालूरकर, नागेश करमे, प्रशांत सरकाटे, सहर्ष निमसरकार, शुभम कांबळे, निखिल रत्नम, अनिल मुरमाडे, सिद्धार्थ झाडे, ओमसाई कोंडागुरले, आशिष साखरकर, निहाल, निर्भय, अंशुल, प्रणय आदींनी सहकार्य केले.

allapalli
Comments (0)
Add Comment