गडचिरोली जिल्ह्यातील डॉक्टरांची रिक्त पदे भरा; राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा शाहीन हकीम यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची भेट घेऊन केली मागणी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

अहेरी, दि. ३१ मार्च : गडचिरोली जिल्ह्यातील डॉक्टरांची रिक्त पदे तात्काळ भरण्यात येऊन आरोग्य सेवेवर पडणारा परिणाम दूर करावा. अशी मागणी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा शाहीन हकीम यांनी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची आज भेट घेऊन केली आहे.

जिल्ह्यात आरोग्याची समस्या पाचवीला पुजली आहे. त्यातच जिल्ह्यात आरोग्य सेवेत मोठ्या प्रमाणात रिक्त पदे असल्याने आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण आहे. त्यामुळे येथील डॉक्टरांची रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावी. त्यासोबत गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांचे व कामगारांचे थकीत वेतन देण्यात यावे व डायलिसिस केंद्र सुरू करण्यात यावे.

अशी मागणी त्यांनी केली आहे. या विषयावर आरोग्य मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून सर्व प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आहे.

हे देखील वाचा : 

गुढीपाडव्यापासून राज्यातील कोरोनाचे सर्व निर्बंध मागे नववर्षापासून नवीन संकल्प करुयात – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

 

आलापल्ली चे खेळाडू चमकले राष्ट्रीय पातळीवर

एखादा निर्णय घेतल्यानंतर कारण नसताना गैरसमज निर्माण होत असतील तर तो निर्णय थांबवला जाऊ शकतो – अजित पवार

lead newsShahin Hakim