आ. प्रकाश सुर्वेंचे होणार जंगी स्वागत

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

मुंबई प्रतिनिधी, दि.५ जुलै : मुंबई- मागठाण्याचे लोकप्रिय आमदार प्रकाश सुर्वे शिवसेनेच्या शिंदे गटात सहभागी झाले आहेत. आमदार सुर्वेंच्या या भूमिकेचे सर्वत्र कौतुक होत आहे. आता आ. सुर्वेंच्या कर्मभूमीत त्यांचे जोरदार स्वागत होणार असून आतापर्यंतचे सर्वात मोठे शक्तिप्रदर्शन उद्या मागठाण्यात होणार असल्याचे असल्याचे समजते. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे हे यावेळी या शक्तिप्रदर्शनात सहभागी होणार आहेत.

प्रकाश सुर्वेंचे समर्थक आणि चाहते संजय गांधी नॅशनल पार्क ते हॉटेल गोकुळ अशी आनंद रॅली काढणार आहेत. यावेळी सुर्वे समर्थक जोरदार शक्तिप्रदर्शन करणार असल्याची चर्चा आहे. यावेळी ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात येणार आहे. तसेच सुर्वे यांचे जंगी स्वागत देखील करण्यात येणार आहे. या मिरवणुकीत दहा हजार समर्थक उपस्थित राहणार असल्याचा अंदाज आहे. उद्या बुधवारी संध्याकाळी ५ वाजता गुलाल उधळत, फुलांचा वर्षाव करीत हे महास्वागत होणार असल्याची माहिती सुर्वे समर्थकांनी दिली.

a prakash surwe cm eknath shindeClead news