गडचिरोलीत १६,८४८ उमेदवार देणार पोलीस शिपाई पदासाठी लेखी परीक्षा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क ,

पोलीस शिपाई या पदासाठी लेखी परीक्षा सकाळी ११ ते १२.३० या वेळेत सामान्य क्षमता चाचणीचा पेपर; तर दुपारी २.३० ते ४ वाजेपर्यंत गोंडी भाषेवरील पेपर होणार आहे. पेपरच्या वेळेपूर्वी परीक्षा केंद्रावर पोहोचता यावे, यासाठी दूरच्या गावांमधील उमेदवार शनिवारी संध्याकाळीच गडचिरोलीत दाखल झाले आहेत. तर काही उमेदवार वाहनांची सुख-सुविधा उपलब्ध असल्याने  वेळेवरच परीक्षा केंद्रावर पोहोचतील.

गडचिरोली दि,१९ : जिल्हा पोलीस विभागात शिपाई पदासाठी १३६ जागांसाठी होत होत असलेल्या पोलीस शिपाई पदाची आज रविवारी दि. १९ लेखी परीक्षा होत आहे. या भरती प्रक्रियेमध्ये जिल्ह्यातील तब्बल १६ हजार ८४८ युवक-युवती अर्ज केले असून ही परीक्षा देणार असल्याने त्यासाठी पोलीस यंत्रणेसह पोलीस शिपाई या पदासाठी अर्ज करणारे उमेदवार सज्ज झाले आहेत.

गडचिरोली जिल्ह्यामध्ये तब्बल ४ वर्षांनंतर पोलीस भरती होत असल्यामुळे पोलीस शिपाई या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे एका जागेसाठी जवळपास १२५ जण या प्रमाणात इच्छुक उमेदवारांनी अर्ज केल्यामुळे त्यांची सुरळीतपणे परीक्षा घेण्याचे आव्हान पोलीस यंत्रणेपुढे आहे. कोणत्याही परीक्षा केंद्रावर कोणतीही गडबड होऊ नये, यासाठी विविध ठाण्यांमधील पोलीस राखीव पोलीस आणि होमगार्ड मिळून १६ केंद्रांवर जवळपास २ हजार अधिकारी व कर्मचारी तैनात राहणार आहेत.

पावसाची शक्यता पाहता या वेळी उघड्या मैदानाऐवजी १६ परीक्षा केंद्रांमधील जवळपास २०० हॉल (खोल्या) मध्ये ही परीक्षा होणार आहे. गेल्या २१ मेपासून पोलीस भरतीसाठी अर्ज भरणे सुरू होते. जिल्हाभरातील पोलीस स्टेशन, उपपोलीस स्टेशन, पोलीस मदत केंद्रांमध्ये अर्ज भरण्याची सुविधा करण्यात आल्याने तेथे बेरोजगार युवक-युवतींनी गर्दी केली होती. अर्ज भरण्यासाठी पोलीस विभागानेच विशेष व्यवस्था केली होती.यासाठी पोलीस अधीक्षक अंकित गोयल, एएसपी (प्रशासन) समीर शेख, एएसपी सोमय मुंडे, एएसपी अनुत तारे (अहेरी) यांच्या मार्गदर्शनात सर्व व्यवस्था लावण्यात आली आहे.

गडचिरोलीत १६ परीक्षा केंद्रावर होणार परीक्षा.

  • नामदेवराव पोरेड्डीवार अभियांत्रिकी महाविद्यालय, बोधली.
  • सुमानंद हॉल, आरमोरी रोड.
  •  शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय, इंदाळा.
  • प्लॅटिनम ज्युबिली हायस्कूल, आरमोरी रोड.
  •  वियाणी विद्यानिकेतन स्कूल, नवेगाव.
  •  शासकीय विज्ञान महाविद्यालय, चामोर्शी रोड.
  • शिवाजी महाविद्यालय, धानोरा रोड.
  •  सुप्रभात मंगल कार्यालय, आरमोरी रोड.
  •  शिवाजी हायस्कूल, गोकुल नगर.
  •  पोलीस मुख्यालय, कॉम्प्लेक्स.
  • .बांबू प्रकल्प कार्यालय, एमआयडीसी.
  • कार्मेल हायस्कूल, साईनगर .
  • एकलव्य इंग्लिश मिडियम स्कूल, सेमाना मार्ग.
  •  शासकीय आयटीआय, चंद्रपूर रोड.
  •  स्कूल ऑफ स्कॉलर्स, धानोरा रोड

हे देखील वाचा,

Clead news M Uddhav ThakareyGadchiroli SP Ankit Goyal