दोटकुली येथील दारू विक्रेत्यांना दिली समज

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

गडचिरोली, 23 मे – चामोर्शी तालुक्यातील दोटकुली येथे मुक्तिपथ तर्फे सघन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीमध्ये गावातील दारूविक्रेत्यांना बोलावून  नोटीस देऊन अवैध व्यवसाय बंद करण्याची समज देण्यात आली. दोटकुली येथील विक्रेत्यांनी चंद्रपूर जिल्ह्यातून दारु आणून विक्री सुरू केली होती. या गावात जवळपास 2 विक्रेते सक्रिय होते. अवैध दारूविक्री बंदीसाठी गाव संघटनेकडून प्रयत्न सुरू असूनही विक्रेत्यांनी आपला अवैध व्यवसाय सुरूच ठेवला. अशातच गावात मुक्तिपथ तर्फे दोन दिवशीय सघन बैठकीचे आयोजन करण्यात आले.

या बैठकीत मुक्तिपथ तालुका संघटक आनंद इंगळे व तालुका चमूने ग्रामस्थांना दारूचे दुष्परिणाम पटवून देत अवैध दारूविक्रीमुळे गावाचा विकास खुंटतो ही बाब स्पष्ट केली. दरम्यान, ग्रामस्थांनी अवैध दारूविक्रीमुक्त गाव निर्माण करण्यासाठी चर्चा करून अवैध दारूविक्री बंद करण्याचा निर्णय घेतला. सोबतच गावातील दारू विक्रेत्यांना बैठकीत बोलावून नोटीस दिली व अवैध व्यवस्था बंद करा अन्यथा कायदेशीर मार्गाने कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य, तंमुस अध्यक्ष, गाव संघटनेचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

हे पण वाचा :-