देसाईगंज शहरात चौकाचौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावे – मनोज ढोरे

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

गडचिरोली: देसाईगंज शहरांमध्ये दिवसाढवळ्या पायी चालणाऱ्या व्यक्तींच्या गळ्यातील सोनं आणि चौका मधून दुचाक्या बेपत्ता होत आहे त्यामुळे शहरातील मुख्य बाजारपेठेमध्ये आणि चौकाचौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावे अशी मागणी जिल्हाधीकारी व नगर परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी यांना पत्रकातून मनोज ढोरे प्रदेश सचिव पोलीस मित्र युवा महासंघ महाराष्ट्र राज्य यांनी मागणी केली आहे.

यावेळी गडचिरोली पोलीस मित्र युवा महासंघ जिल्हाध्यक्ष मनोज तलमले, जिल्हा कार्याध्यक्ष कुलदीप सोनकुसरे, पत्रकार जिल्हा अध्यक्ष शैलेश पोटूवार, जिल्हा उपाध्यक्ष नितेश पाटील जिल्हा सरचिटणीस स्वप्निल कराडे, जिल्हा सहसचिव भरत दयलाणी, जिल्हा संघटक रश्मी पगाडे आणि इतर पोलीस मित्र उपस्थित होते