मंत्री संजय राठोड यांना कोरोनाची लागण

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 
  • मुंबईमधील सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये त्यांनी कोरोनाची चाचणी केली होती.
  • घरीच झाले क्वारंटाईन, संपर्कात आलेल्यांना चाचणी करण्याचे केले आवाहन.

मुंबई, दि. २८ ऑगस्ट : देशातून कोरोनाने काढता पाय घेतला असतांना, लॉकडाऊन हा शब्द देखील विस्मृतीत गेला असताना राज्याचे मंत्री संजय राठोड यांना करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. आपल्याला कोरोनाची लागण झाल्याचे तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांनाही कोरोनाची चाचणी करण्यास त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून सांगितले आहे.

आज सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये त्यांनी कोरोनाची चाचणी केली ती पॉझिटिव्ह आली.मात्र लक्षणे नसल्याने त्यांना घरीच क्वारंटाईन होण्यास सांगितले आहे. वादग्रस्त ठरलेल्या राठोड यांना झाल्याने सोशल मीडियावर याविषयी चर्चा होत आहे.

हे देखील वाचा : 

काळजी करू नका, सर्वतोपरी मदत करणार – मंत्री सुधीर मुनगंटीवार

परली औष्णिक केंद्राजवळ स्फोट घडवण्याचा प्रयत्न ?

 

lead newsSANJAY RATHOD