बेळगाव संयुक्त महाराष्ट्र व्हावा यासाठी बेळगांव व सिमाभागात १ नोव्हेंबर पाळला जातो काळा दिवस…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

सीमाभागातील नागरिकांना पाठिंबा दर्शवण्यासाठी महाविकास आघाडी सरकारचे मंत्रिमंडळ १ नोव्हेंबर रोजी काळ्या फिती बांधून काम पाहणार आहे. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी आपल्या हाताला काळी फित बांधून काम सुरु केले.
महाराष्ट्रातील जनता ही सीमा भागात अडकलेल्या मराठी भाषिक बांधवांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे.

संपूर्ण सीमा भागासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात खटला सुरू आहे, लवकरच हा सीमाभाग महाराष्ट्राला मिळेल,अशी आम्हाला अपेक्षा आहे. मात्र अजूनही कर्नाटक सरकार कडून सीमा भागातील मराठी भाषिकांवर अन्याय होत आहे, त्याच्या निषेधार्थ आम्ही हाताला काळी पट्टी लावून काम करीत आहोत, असे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले.

black day