तलावांमधील तरंगता कचरा स्वच्छ करण्यासाठी नागपूर मनपाला मिळाले ‘रिमोट ऑपरेटेड बोट’..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  

नागपूर दि.२४ मार्च:तलावाच्या स्वच्छतेसाठी विविध प्रकारे प्रयत्न केला जात असतो .नागपुरातील विविध तलावातील कचरा आता रिमोट ऑपरेटेड बोट’द्वारे स्वच्छ केला जाणार आहे .

नागपूर शहरातील फुटाळा, अंबाझरी, सोनेगाव तलावांच्या स्वच्छतेसाठी आणि स्वच्छ भारत मिशनला पाठबळ देण्यासाठी नागपूर महानगरपालिकेला मोठे सहकार्य मिळाले असून इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडद्वारे 29 लक्ष रुपये सीएसआर निधीतून मनपाला ‘रिमोट ऑपरेटेड बोट’ प्राप्त झालेली आहे. बॅटरीआधारीत या बोटद्वारे शहरातील प्रमुख तलावांमधील तरंगता कचरा स्वच्छ करण्याचे महत्वाचे कार्य होणार आहे.

nagpurremote operated boat