ओबीसी समाजाच्या जनगणनेसाठी सरकारवर दबाव निर्माण करण्याची गरज – भास्करराव अंबेकर

विजय साळी, लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

जालना, दि. ०१ जानेवारी: जालना शहरात आज ओबीसी, व्ही.जे.एन.टी., एस.बी.सी., सामाजाच्या संपर्क कायालयाचे उद्घाटन आ. राजेश राठोड यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी अंबेकर हे प्रमुख पाहुणे म्हणुन बोलत होते. या कार्यक्रमास जेष्ठ् नेते दलित मित्र् बाबुराव सतकर, ॲङ शिवाजीराव आदमाने, ॲङ अशोकराव तारडे, उद्योजक मनोहरराव सिनगारे, पांडुरंग क्षिरसागर, राजेंद्र वाघमारे, अब्दुल बासेद कुरेशी आदिंची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी पुढे बोलतांना अंबेकर म्हणाले देशात ओबीसी समाजाची लोकसंख्या 52% पेक्षा अधिक आहे. मात्र् या संख्येच्या तुलनेत आर्थिक तरतुद अत्यंत नगण्य् केली जाते. आर्थिक तरतुद कमी केली जात असल्यामुळे ओबीसी समाजाच्या विकासाच्या वाटा खुंटल्या आहे. या प्रवर्गाला विकासाच्या दिशेने न्यायचे असेल तर सरकारने देशभरातील ओबीसी समाजाचे जनगणना करण्याचे काम तातडीने हाती घेण्याची आवश्यकता आहे. यासाठी तुम्हा आम्हाला संघटीत होऊन सरकारवर दबाव निर्माण करावा लागेल. ओबीसी समाजाची जनगणना झाली तर अर्थंसंकल्पात संख्येच्या प्रमाणात आर्थिक तरतुद होईल आणि याचा लाभ ओबीसी समाजातील येणाऱ्या पिढीला मिळेल.

सरकारकडे गाऱ्हाणे मांडणार- आ. राजेश राठोड

महाराष्ट्रातील ओबीसी समाजाची जनगणना होण्याची अत्यंत गरज असुन त्यासाठी आपण स्वतः पुढाकार घेऊन सरकारकडे गाऱ्हाणे मांडणार असल्याची ग्वाही आ. राजेश राठोड यांनी आज येथे बोलतांना दिली. जनगणना झाल्याशिवाय ओबीसी समाज विकासाच्या प्रवाहात येणार नाही. ही अत्यंत जुनी मागणी असुन या मागणीकडे केंद्र सरकार सातत्याने दुर्लक्ष करत आहे. राज्य् आणि केंद्र शासनाने ओबीसी समाजाच्या या मागणीची गांर्भीयाने दखल घेतली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करुन येणाऱ्या 24 जानेवारी रोजी जालन्यात आयोजित करण्यात आलेल्या विशाल मोर्चात जिल्हाभरातील ओबीसी, व्ही.जे.एन.टी., व एस.बी.सी. समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन हा मोर्चा यशस्वी करावा असे अवाहन आ. राठोड यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ओबीसी, व्ही.जे.एन.टी., व एस.बी.सी. संयोजन समितीचे संयोजक राजेंद्र राख यांनी केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकातुन कार्यक्रमाची भुमिका विषद केली तर अशोक पांगारकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमास ओबीसी, व्ही.जे.एन.टी. व एस.बी.सी.समाजातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अंबेकर