महापरिनिर्वाण दिनानिमित्य मुंबई महानगरपालिकेची तयारी पूर्ण

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

मुंबई, दि. ५ डिसेंबर : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या  ६६ व्या महापरिनिर्वान दिनानिमित्त मुंबईतल्या चैत्यभूमी येथे राज्यासह देशभरातील अनुयायी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहण्यासाठी दाखल होण्यास मोठ्या संख्येनं सुरूवात झाली आहे. इथं दाखल होत असलेल्या अनुयायांसाठी शासन, मुंबई महानगरपालिका, आरोग्य विभाग यांच्यासह डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वानदिन समन्वय समिती यांच्याकडून शिवाजी पार्क येथे विविध व्यवस्थेचं आयोजन करण्यात आले आहे.

यापूर्वी डिसेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाची घटना पाहता यावर्षी अनुयायांसाठी महानगरपालिकेकडून शिवाजी पार्कमध्ये दोन वॉटर प्रुफ असे तंबू उभारण्यात आले असून प्रत्येकी तबूत ५० हजार अनुयायी राहू शकतील. तसंच आरोग्याच्या दृष्टीनं येथे  आरोग्य नियंत्रण कक्ष आणि तपासणी कक्ष , २० हून अधिक रूग्णवाहिका उपलब्ध करून ठेवण्यात आल्या आहेत. तसंच फलकांच्या माध्यमातून आरोग्याबाबत जनजागृती करण्यात येत असून स्वच्छतेच्या दृष्टीनं शौचालय, स्नानगृह , पिण्याच्या पाण्यासाठी २०० नळ, भोजनासाठी मंडप उभारण्यात आले आहेत. अशी माहिती महानगरपालिकेचे विभाग उचायुक्त रमाकांत बिराजदार यांनी दिली.

सुरक्षेच्या दृष्टीनं परिसरात राज्य पोलिस दलाकडून तीन हजारहून अधिक पोलिस तैनात करण्यात आले आहेत. तसंच परिसरात सीसीटीव्ही कॅमेरा, ठिकठिकाणी पाहणी चौक्या तसंच बॉम्ब शोधक पथक तैनात करण्यात आलं आहे.

रमाकांत बिराजदार, उचायुक्त, महानगरपालिका विभाग

 

कोरोना प्रादुर्भावामुळे गेल्या दोन वर्षात अनुयायांना चैत्यभूमी इथं आपल्या महामानवला अभिवादन करता येत नव्हतं पण दोन वर्षानंतर चैत्यभूमि इथं डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करता येईल म्हणून अनुयायांमध्ये समाधानाचं वातावरण आहे.

ज्ञानेश्वर चव्हाण, पोलीस उपायुक्त.

हे देखील वाचा : 

मौजा जांबुळधरा येथे टाटा सामाजिक विज्ञान संस्थान,मुंबई ने केला अभ्यास दौरा

 

 

 

 

Mahamavan Bharatratna Dr. Babasaheb AmbedkarMahaparinirwan Dinmumbai