टोयागोंदी या आदिवासी क्षेत्राच्या विकासासाठी कटिबद्ध खासदार अशोक नेते यांची ग्वाही

सालेकसा तालुक्यातील टोयागोंदी येथे खा. अशोक नेते यांचा जनसंपर्क दौरा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली २९ ऑगस्ट :सालेकसा तालुका हा अतिदुर्गम व आदिवासी बहुल क्षेत्र असून या क्षेत्रातील कामे अजूनही प्रलंबित आहेत त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. मी या क्षेत्राचा खासदार म्हणून या क्षेत्राच्या सर्वांगिण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन खासदार अशोक नेते यांनी केले. सालेकसा तालुक्यातील अतिदुर्गम, नक्षलग्रस्त भागातील टोयागोंदी येथे जनसंपर्क दौऱ्यादरम्यान आदिवासी बांधवांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

खासदार अशोक नेते यांनी  27 आगस्ट रोजी आमगाव विधानसभा क्षेत्रातील सालेकसा तालुक्यात  अतिदुर्गम व नक्षलग्रस्त भागात दौरा केला यावेळी टोयागोंदी येथे आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खास.अशोक नेते होते तर प्रमुख पाहुणे म्हणून आमगाव विधानसभा क्षेत्राचे  माजी आमदार संजय पुराम, भाजपचे गोंदिया जिल्हा संघटन महामंत्री विरेंद्र अंजनकर, जिल्हा सचिव परसराम फुंडे, ज्येष्ठ नेते खेमराज लिलारे, शंकर मडावी, माजी सभापती मनोज विश्वकर्मा, सालेकसा तालुका अध्यक्ष मुन्नाभाई बिसेन, संजय कटरे, महिला आघाडीच्या महासचिव कल्याणीताई कटरे, टोयागोंदी च्या सरपंच मडावी, उपसरपंच बानोटे , ज्येष्ठ नेत्या मडकाम व भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

हे देखील वाचा :

राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामातील ‘महाभ्रष्टाचार’ थांबवा : शेतकरी कामगार पक्षाचा इशारा

 

दोन वर्षांपासून सोंडो येथील बंद पथदिवे तात्काळ सुरू करण्याची युवा स्वाभिमान पक्षाची मागणी

mpashoknetesalekasa