ठाण्यातील पर्यटकांना गायमुख खाडीत “तरंगते हॉटेल” संकल्पना लवकरच

तरंगत्या हॉटेल मध्ये मेजवानी अनुभवता येणार.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

ठाणे : परदेशातील धर्तीवर महाराष्ट्र पर्यटन विभागाने सुरू केलेले बोटीवरील तरंगते हॉटेलची मेजवानी पर्यटकांना ठाण्यात देखील अनुभवता येणार आहे. सोमवार पासून या प्रकल्पाला सुरुवात होणार असून ठाण्याच्या गायमुख खाडीजवळ तरंगते हॉटेल सुरू होणार आहे. सद्या कोरोनामुळे 50 टक्के क्षमतेने हॉटेल सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येणार असून त्यासाठी एक जेट्टी दाखल झाली असून सुसज्ज अशी व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे ठाणेकरांना आता तरंगते हॉटेलची मेजवानी अनुभवता येणार आहे.

गोव्याप्रमाणेच महाराष्ट्रातही पर्यटनाला चालना देण्यासाठी मुंबईत पहिल्या तरंगत्या हॉटेलचं संकल्पना मांडण्यात आली होती. ही संकल्पना मुंबईमध्ये अंमलात आणली होती. मात्र लॉकडाऊन आणि निर्बंधामध्ये या तरंगत्या हॉटेलची सफर बंद करण्यात आली होती. मात्र आता ठाण्याच्या गायमुख खाडीजवळ सुरुवात होणार असून ठाणेकरांना आगळा वेगळा अनुभव या सोमवार पासून मिळणार आहे.

गायमुख येथे या तरंगत्या हॉटेलमधून एकबाजूला खाडी आणि दुसऱ्या बाजूला डोंगराळ भाग असा नयनरम्य दर्शन होणार असून, या संकल्पनेतून पर्यटन स्थळांना नवा लूक देण्यात येणार आहे. द.सी.फ्लोटिंग रेस्टोरेंट ही खासगी कंपनी हे हॉटेल सुरू केले असून महाराष्ट्र शासनाने ही संकल्पना मांडली आहे.

हे देखील वाचा :

जिल्हा परिषद पोटनिवडणुक; शेवटच्या दिवशी नामांकन दाखल करण्यासाठी इच्छुकांची गर्दी

संपूर्ण फी माफीसाठी AISF चं मुंबई आझाद मैदानावर आंदोलन, विद्यार्थी कार्यकर्त्यांना पोलिसांनी केली अटक

दिलासादायक! इंग्रजी शाळेच्या फी मध्ये २५ टक्के कपात; मेस्टा संघटनेचा मोठा निर्णय

 

lead storythane