“त्या” दोन हत्तीचा मृत्यू हरपिस(EEHV) या आजाराने, डॉ.रविकांत खोब्रागडे पशुवैद्यकीय अधिकारी वन्यजीव ताडोबा अंधारी वाघ्र प्रकल्प चंद्रपूर यांची माहिती

मृत अर्जुन हत्तीचे वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यां व पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये शवविच्छेदन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली ७ ऑगस्ट : हत्तीसाठी राज्यात  प्रसिद्ध असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील कमलापूर येथील शासकीय हत्ती कॅम्प मध्ये काल शुक्रवारी अर्जुन या ३० महिन्याच्या हत्तीचा अचानक मृत्यू झाला होता. त्यामुळे वनविभागाच्या वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली होती.तीन दिवसाच्या  कालावधीत दुसऱ्या हत्तीचा मृत्यू झाल्याने वनविभागाची यंत्रणा प्रचंड हादरली होती.

काल मरण पावलेल्या अर्जुन हत्तीवर  आज सकाळी वनविभागाचे प्रधान मुख्य वनसंरक्षक हुडा,गडचिरोली वनपरिक्षेत्राचे मुख्य वनसंरक्षक डॉ.किशोर मानकर ,सिरोंचा वनविभागाचे उपवनसंरक्षक सुमितकुमार सहायक वनसंरक्षक, एस.पवार  पशुवैद्यकीय अधिकारी वन्यजीव ताडोबा अंधारी वाघ्र प्रकल्प चंद्रपूर रविकांत खोब्रागडे यांच्या उपस्थिती मध्ये अंतिम सोपस्कार पार पाडण्यात आले. डॉ.रविकांत खोब्रागडे पशुवैद्यकीय अधिकारी वन्यजीव ताडोबा अंधारी वाघ्र प्रकल्प चंद्रपूर यांनी अर्जुन हत्तीचे शवविच्छेदन केले.

डॉक्टरांनी हत्तीच्या मृत्यूचे कारण हरपिस (EEHV) हा आजार असल्याचे सांगितले. याआधी 3 ऑगस्ट ला सई या तीन वर्षाच्या हत्तीचा अचानक मृत्यू झाला होता.त्यामुळे शासकीय हत्ती कॅम्प कमलापूर  येथील दोन हत्तीचा एकाच आठवड्यात मृत्यू झाला असल्याने वन्यजीवप्रेमीं मध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

हे देखील वाचा ,

कमलापूर हत्ती कॅम्प मध्ये अडीच वर्षाच्या अर्जुन हत्ती चा मृत्यू.!.

 

तीन वर्षांच्या सई हत्तीणीच्या पिल्याचा अचानक मृत्यू झाल्याने वनविभागाच्या वर्तुळात उडाली खळबळ.

 

सई हत्तीणीचा मृत्यू मागे “हे” आहे कारण वनविभागाने केले स्पष्ट.. सहाय्यक वनसंरक्षक व त्या पदावरील वरीष्ठ अधिकारी यांच्या मार्फत होणार चौकशी

 

gadchiroliforestkamalapurelephantcampleadstory