‘ब्रेक दी चैन’ अंतर्गत जिल्ह्यात १५ मे २०२१ पर्यंत जमावबंदी व टाळेबंदी जाहीर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. ३० एप्रिल: राज्यात कोविड-१९ साथरोग संदर्भाने उचित प्रतिबंधात्मक उपाययोजनानंतर्गत  फौजदारी प्रक्रिया दंड संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये जिल्ह्यात मनाई आदेश व कोविड-१९ साथरोग संदर्भान मिशीन बिगीन अगेन अंतर्गत नियमावली व उपाययोजना जिल्ह्यात लागू आहेत.

त्याअनुषंगाने शासन आदेशातील तरतुदीच्या अनुषंगाने गडचिरोली जिल्ह्यातील नागरी, ग्रामीण तसेच औद्योगिक क्षेत्रातील जनतेस, खालील व्यक्ती, आस्थापना यांना उद्देशून यापूर्वी लागू असलेले लॉकडाऊन संदर्भात आदेश काढणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, गडचिरोली यांनी शासन निर्देशाप्रमाणे कोविड-१९ साथरोग अंतर्गत ब्रेक द चैन अंतर्गत वेळोवेळी सुरु केलेले व प्रतिबंधीत बाबींना जिल्हा गडचिरोली क्षेत्रात जमावबंदी व टाळेबंदीसंदर्भात नियमावली आणि उपाययोजना कालावधी १ मे २०२१ चे सकाळी ७.००  वाजेपासून दिनांक १५ मे २०२१ चे सकाळी ७.००  वाजेपर्यंत लागू करीत आहे.

यापुर्वीचे शासन आदेशातील अटी, शर्ती दंडाबाबत निर्देशाचे काटेकोरपणे पालन करणे सर्व संबंधित व्यक्ती, आस्थापना व शासकीय- निमशासकीय विभागांना बंधनकारक असेल जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, दीपक सिंगला यांनी कळविले आहे.

Gadchiroli Lockdown