जिल्हास्तरीय ऑनलाइन रोजगार मेळावा13 ते 15 सप्टेंबर या कालावधित होणार आयोजित

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली 03 सप्टेंबर:  जिल्हा कौशल्य विकास व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र गडचिरोली यांचे मार्फत भव्य रोजगार मेळावा दिनांक 13 सप्टेंबर 2021 ते 15 सप्टेंबर 2021 या कालावधीत ऑनलाइन पध्दतीने सकाळी 10 ते 6 या कार्यालयीन वेळेत आयोजीत करण्यात आलेला आहे. इच्छूक उमेदवारांनी नोंदणी करीता या कार्यालयाचे दुरध्वनी क्रमांक 07132-222368 वर संपर्क साधावा किंवा प्रत्यक्ष कार्यालयात येऊन नोंदणी करावी तसेच या कार्यालयाचे ईमेल gadchrolirojgar@gmail.com वर   सुध्दा आपले आवेदन पाठवता येतील .

सदर मेळाव्यात भरण्यात येणारी रिक्त पदे ही नागपूर येथील मिहान बुटीबोरी, हिंगणा या औद्योगिक क्षेत्रातील कंपन्या सहभागी होणार असून उमेदवाराच्या शैक्षणिक अहर्तेनुसार उमेदवारांची निवड करावयाची आहे. सदर रोजगार मेळाव्यामध्ये 160 रिक्त पदांकरीता 10 कंपन्या सहभागी होणार आहेत.यामध्ये उमेदवारांचे वय 18 ते 45 असून शैक्षणिक अहर्ता किमान 10 वा वर्ग पास ते कोणत्याही शाखेचा पदवीधर तसेच  ITI ,POLYECHNIC, B.E व MBA झालेले उमेदवार नोंदणी करु शकतात.

तरी गडचिरोली जिल्हयातील जास्तीत जास्त सुशिक्षित युवक-युवतींनी रोजगार मेळाव्याकरिता आपले नांव नोंदविण्याचे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त प्रवीण खंडारे, जिल्हा कौशल्य विकास अधिकारी गणेश चिमणकर व जिल्हा समन्वयक अतुल महाजन यांनी केले आहे.

employment